भार्गवी चिरमुलेचा नवा चित्रपट 'गुल्हर' प्रदर्शनासाठी सज्ज | bhargavi chirmule's new movie 'gulhar' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhargavi chirmule in gulhar movie

भार्गवी चिरमुलेचा नवा चित्रपट 'गुल्हर' प्रदर्शनासाठी सज्ज

मराठी चित्रपट सृष्टीत ग्रामीण चित्रपटांचे महत्व अनन्यसाधारण आहे. ग्रामीण चित्रपटातूनच मराठी चित्रपट समृद्ध होत गेला. सध्या आशाच एक ग्रामीण चित्रपटाची चर्चा आहे. ग्रामीण जीवनातील संघर्ष दाखवणारा हा चित्रपट प्रेम, नातेसंबंध, गामीण जीवन अशा विविध पैलूंवर भाष्य करतो. 'गुल्हर ' असे या चित्रपटाचे नाव असून येत्या ६ मी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: 'लॉकअप' चा आता फिनालेच्या दिशेनं प्रवास

'गुल्हर' या नावावरून चित्रपटातील वेगळेपण समोर येते. प्रवाहाच्या जाऊन काहीतरी वेगळं जग उलगडणारा हा चित्रपट धनगर समाजातील जीवन अधोरेखित करतो. या चित्रपटात अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि रवी काळे प्रमुख भूमिकेत असून या निमित्ताने ही नवी जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बऱ्याच दिवसांनी भार्गवी चित्रपटात दिसणार असून तिच्या भूमिकेची बरीच चर्चा आहे.

हेही वाचा: 'शेर शिवराज'ची विक्रमी घोडदौड, एका दिवसात कमावले..

‘गुल्हर’ (gulhar marathi movie) या चित्रपटाच्या निमित्ताने काही वेगळे प्रयोग करण्यात आल्याचे संकेत निर्माते शांताराम मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, अबिद सय्यद यांनी दिले आहेत. या चित्रपटातील रवी काळे आणि भार्गवी चिरमुले ही जोडी हे मुख्य आकर्षण ठरणार असल्याचा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रवी आणि भार्गवी यांनी प्रथमच एकत्र काम केलं आहे. या चित्रपटात रवी यांनी गिरीजू ही व्यक्तिरेखा साकारली असून, त्यांच्या जोडीला राधेच्या भूमिकेत भार्गवी आहे. (bhargavi chirmule lead)

प्रगतीपासून लाखो कोस दूर असलेल्या, तसंच प्रतिकूल परिस्थितीतही सुखी राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबाची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा एका ११ वर्षांच्या मुलाभोवती गुंफण्यात आली आहे. यात विनायक पोद्दार, माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर, गणेश कोकाटे, कपिल कदम, पुष्पा चौधरी, शिवाजी भिंताडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. मोहन पडवळ यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचे तर नृत्य दिग्दर्शन विशाल पाटील यांचे आहे.

Web Title: Bhargavi Chirmules New Movie

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top