esakal | भारती म्हणते, कोरोनात 'चान्स' नकोच, रिस्कीये...

बोलून बातमी शोधा

bharti singh
भारती म्हणते, कोरोनात 'चान्स' नकोच, रिस्कीये...
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनानं सर्वांची चिंता वाढवली आहे. व्हॅक्सिनेशनसाठी सरकारकडून जसे आवाहन करण्यात येत आहे तसेच आवाहन बॉलीवूडच्या सेलिब्रेटींकडूनही केले जात आहे. त्यामुळे कोरोनाला हटवण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न केले जात आहे. बॉलीवूडचा कोरोनाची लागण झाली आहे. त्यात अनेक सेलिब्रेटींना कोरोना झाला आहे. काही सेलिब्रेटी घरातच क्वॉरनटाईन झाले आहेत. त्यांनी चाहत्यांना कोरोनाची दुसरी लाट अतिशय धोकादायक असून त्यांनी सुरक्षित राहण्यासाठी काळजी घ्यायला हवी. अशाप्रकारचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. याशिवाय काही सेलिब्रेटींनी आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अशा निर्णयांना सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली आहे.

भारती सिंग (bharti singh) कॉमेडियन म्हणून प्रसिध्द आहे. तिनं आपल्या कॉमेडियन व्यक्तिमत्वातून वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. ती आता प्रख्यात सेलिब्रेटी झाली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्येही तिचं नाव आल्यामुळे तिच्या भोवती वाद चिकटला होता. त्यावरुन तिला ट्रोलही करण्यात आले होते. विशेषत; ज्यावेळी बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. तेव्हा तिचं नाव चर्चेत होतं. याचा भारतीला प्रचंड मानसिक त्रास झाल्याचं तिनं एका पोस्टमधून सांगितलं होतं.

आता भारती चर्चेत आली आहे ते तिच्या एका वेगळ्या पोस्टमुळे. कोरोनाच्या काळात आपल्याला बेबी प्लॅनिंग करायचे नाही. असे तिनं म्हटलं आहे. कोरोनात ते जास्त धोकादायक आहे असे तिचे म्हणणे आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला आहे. कोरोनामुळे भारतीच्या मनात भीती तयार झाली आहे. त्याचा परिणाम म्हणजे तिला बेबीसाठी चान्स घ्यायचा नाही. हे तिनं सांगितले आहे.

हेही वाचा: 'डुप्लिकेट मेडिसिन', ग्लुकोज भरुन विक्री, अभिनेत्रीची पोस्ट

हेही वाचा: 'ऑक्सिजन वाढवण्यासाठी झाडे लावा'; नेटकऱ्यांनी कंगनाला काढलं मूर्खात

त्याचं झालं असं की, डान्स दिवाने च्या एका भागातील स्पर्धकानं परफॉर्मन्स दिला. त्यात एका १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यु झाल्याचे दाखविण्यात आले होते. असे सांगितले जाते की ती खरी घटना आहे. या परफ़ॉर्मन्सनंतर दर्शक भावनाशील झाले होते. त्याचा परिणाम भारतीवरही झाला. तो डान्स पाहिल्यावर ऱडू आवरणं कठीण झालं होतं. तिनं सांगितलं की, आम्ही बेबी प्लॅन करण्याचा विचार करत होतो. मात्र आताची परिस्थिती पाहता ते ठीक वाटत नाही.