भारती सिंगचा हॉस्पिटलच्या लेबर रुममधील डिलिव्हरीआधीचा व्हिडीओ व्हायरल

भारती सिंगनं हा व्हिडीओ स्वतः शूट केला आहे आणि आपल्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.
Bharti Singh
Bharti Singh Google

प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंग(Bharti Singh) आई बनली आहे. तिनं नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. भारतीनं स्वतः सोशल मीडियावर खास पोस्ट करीत या गूड न्यूजविषयी चाहत्यांना सांगितलं होतं. यानंतर आता चक्क भारतीचा हॉस्पिटलमधील लेबर रुममधील डिलीव्हरी आधीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकत आहोत की भारती लेबर पेनमध्ये आहे आणि हॉस्पिटलमध्ये आपल्या बाळाचा जन्म कधी होणार याची वाट पाहत आहे. हा व्हिडीओ भारतीनं स्वतः शूट केला आहे आणि आपल्या स्वतःच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.

भारतीनं हा व्हिडीओ 'लाइफ ऑफ लिंबाचिया' या आपल्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. हर्ष आणि भारतीनं या व्हिडीओला टायटल देताना लिहिलं आहे. ''इट्स अ बॉय,गूड न्यूज आऊट..'' .या ब्लॉगची सुरुवात होते ती भारती सिंगच्या आवाजाने. ती बोलताना दिसत आहे की, ''अखेर तो क्षणं आला जेव्हा आमचं बाळ या जगात येणार आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतोय जिथे भारती एका मुलाला जन्म देण्याविषयी बोलत आहे तिथे नवरा हर्ष मात्र सहा मुलांची डिमांड करीत आहे''.

Bharti Singh
आलिया-रणबीरचं पारंपरिक लग्न! 'या' पद्धतीत रंगणार विवाहसोहळा

या व्हिडीओत भारती सिंगच्या चेहऱ्यावर भीती आणि उत्साह या दोन्ही भावना एकाच वेळेस दिसत आहेत. मध्येच भारती जवळ असलेल्या परिचारिकेला देखील प्रश्न विचारताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे. भारतीच्या प्रत्येक हालचालीला,तिच्या हावभावांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यात हर्षने, तिच्या नवऱ्याने कुठलीच कसर सोडली नाही. व्हिडीओच्या शेवटी हे दोघेही बोलताना दिसत आहेत की अखेर त्यांनी आपल्या मुलाला जन्म दिला आहे.

Bharti Singh
धर्मेंद्रमुळे रुपाली गांगुलीच्या वडिलांना राहतं घर विकावं लागलं होतं...

भारतीनं प्रेग्नेंसीच्या शेवटच्या महिन्यापर्यंत काम केलेलं आपण सर्वांनीच पाहिलंय. नेहमी मीडियाचे फोटोग्राफर तिला शूटिंगच्या सेटवर स्पॉट करताना दिसले होते. इतकंच नाही तर प्रेग्नेंसी दरम्यानही तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले आहेत. भारतीनं प्रेग्नेंसी दरम्यान मीडियाशी बोलताना सांगितलं होतं की तिला एका छानशा मुलीला जन्म द्यायचा आहे. पण तिची ही इच्छा सध्या तरी अपूर्ण राहिली आहे. जेव्हा एका पत्रकारानं जेव्हा भारतीला प्रश्न विचारला होता की,तुला मुलगा हवा की मुलगी तेव्हा भारतीनं म्हटलं होतं,मला मुलगी हवी आहे. माझ्यासारखीच मेहनती. तुमच्यासारखँ नाही,जे एका मुलीला मध्येच रस्त्यात थांबवून मुलाखत घेतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com