हेमांगी कवी थिरकली दाक्षिणात्य गाण्यावर, तेही जावयासोबत? काय आहे प्रकरण ? |hemangi kavi instagram post : dance with jawai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hemangi kavi

हेमांगी कवी थिरकली दाक्षिणात्य गाण्यावर, तेही जावयासोबत? काय आहे प्रकरण?

Entertainment News :हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. विशेष म्हणजे अभिव्यक्तीच्या आधारावर अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे ती कायमच सोशल मीडियावर आपल्याला सक्रिय दिसते. नुकताच तिने एका दाक्षिणात्य गाण्यावर डान्स केला आहे.

हेही वाचा: अपघातानंतर मलायका अरोरा पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद, म्हणाली...

अभिनेत्री हेमांगी कवी (hemangi kavi) पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आली आहे. यंदा तिचा खास अंदाज चाहत्यांना पाहायला मिळतोआहे. कारण चक्क तिने एका दाक्षिणात्य गाण्यावर डान्स केला आहे. पण यंदा डान्स करताना ती एकटी नाही तर तिच्यासोबत तिचा जावई आहे. 'रामम्मा रसम्मा' या गाण्यावर तिने ताल धरला आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अभिनयापलीकडे अनेक सामाजिक विषयांवर, स्त्रियांच्या प्रश्नांवर बेधडक मत मांडत असल्याने हेमांगी चर्चेत असते. नुकतंच तिने डॉ. बाबासाठीच आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 'माफ करा बाबासाहेब' अशी पोस्ट लिहिली होती.

हेही वाचा: तोंड बंद ठेवा.. कारण मोदींची नक्कल करणं गुन्हा आहे; तब्बल पाच वर्षांनी श्याम रंगीला ने मांडली खंत

हेमांगीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ऍक्टिव्ह असण्याबरोबरच ट्रेंडिंग गाण्यांवर व्हिडीओ पोस्ट करत असते. ती अभिनयासोबत नृत्यातही चांगलीच माहीर आहे. यंदा शेअर केलेल्या व्हिडीओला तिने 'जेव्हा जावई सासूला भेटतो' (when would be jawai meets his saasu..)असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे हेमांगी सोबत नाचणारा तिचा जावई कसा असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. (hemangi kavi dance video)

हो, खरं आहे.. तो तिचा जावईच आहे. 'लेक माझी दुर्गा' या मालिकेत ते दोघेही एकत्र काम करतात. या मालिकेत हेमांगी वैजू ही भूमिका साकारत असून तिला एक जावईही आहे. 'जयसिंग' असे त्यांचे मालिकेतील नाव आहे, त्यामुळे हे सासू आणि जावई आई चक्क गाण्यावर थिरकले आहे. हा व्हिडीओ चित्रीकरणाच्या दरम्यान काढलेला आहे. हेमांगी सोबत नाचणाऱ्या कलाकाराचे नाव स्वप्नील पवारआहे. (actor swapnil pawar )तोही एक उत्तम अभिनेता आहे.

हेही वाचा: काँडम कंपनीकडून रणबीर आलियाला खास शुभेच्छा; म्हणाले 'आमच्याशिवाय..'

या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाल्या असून अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वप्नील पवार याने देखील एक मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. 'सासू आमच्या नादखुळा.. त्यामुळे सासरला यायला लागतंय परत' अशी कमेंट त्याने केली आहे. तर अभिनेता सुनील इनामदार याला उद्देशून हेमांगी म्हणते, 'तुही तयारीत राहा.. उद्या आपल्याला डान्स करायचाय'. अलीकडेच तीने असाच एक व्हिडीओ तीच्या इंस्टाग्राम अकाउंटला पोस्ट केला होता. ज्या व्हिडिओत डोळ्यांनी इशारे करत जणू ती बंदूकीचा निशाणा साधतेय. 'पोचला का बाण तसं लागली का गोळी! अखियो से गोली मारे!!!' असे कॅप्शन देत तीने त्या व्हिडीओला दिले होते.

Web Title: Hemangi Kavi Instagram Post Dance With

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top