'लोक चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे, पण..'; भारतीने सांगितल्या कटू आठवणी

मनिष पॉलच्या चॅट शोमध्ये भारतीने हजेरी लावली होती.
bharti sing
bharti singfile image

छोट्या पडद्यावरील कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी कॉमेडियन भारती सिंग (bharti singh) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. पती हर्ष लिंबाचियासोबतचे (harsh limbachiyaa) विनोदी व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करते. ‘लाफ्टर चॅलेंज’ या शोमधून भारतीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. भारतीने नुकतेच मनिष पॉलच्या (manish paul) चॅट शोमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. भारती मनोरंजन क्षेत्रात जेव्हा नवी होती, तेव्हा ज्या संकटांना ती सामना करत होती, त्याबद्दल भारतीने या चॅट शोमध्ये खुलासा केला आहे. (bharti singh tell her experience in manish paul chat show abou being touched inappropriately)

शोमधील इव्हेंटमध्ये को-ऑर्डिनेटर करत होते चुकीच्या पद्धतीने स्पर्श

मनिषच्या चॅट शोमध्ये भारतीने सांगितले, "अनेकदा इव्हेंटमध्ये को-ऑर्डिनेटर गैरवर्तन करत असत. ते लोक मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत. मला माहित होतं की, हे चुकीचं आहे. पण मी विचार करत असे की, हे तर माझ्या काकांसारखे आहेत. माझ्याशी काही चुकीचं वागणार नाहीत. पण मी चुकीची होते. आता मला समजत आहे की, ते सर्वच किती चुकीचं होतं. मला वाटायचं हे सर्व ठीक नाहीये. पण त्यावेळी मला तेवढी समज नव्हती. पण आता मी या सर्व गोष्टींना विरोध करू शकते. आता मी बिनधास्त बोलू शकते, 'काय चाललंय? काय पाहताय? बाहेर जा मला कपडे बदलायचे आहेत.' आज मी हे सर्व बोलू शकते. पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. कोणाला विरोध करण्याची हिंमत माझ्यात नव्हती.' शोच्या सेटवरील लोकांमुळे अनेक वेळा भारती तिच्या आईसोबत शूटिंगला जात होती असेही तिने या वेळी सांगितले.

bharti sing
'देवमाणूस' मालिकेतील सरू आजींच्या म्हणीवरून वाद; निर्मात्यांनी दिलं स्पष्टीकरण
bharti sing
'आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?'; म्हणणाऱ्यांना उर्मिलाचं सडेतोड उत्तर

आर्थिक परिस्थिती बिकट

भारतीला बालपणी बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागले होते. भारतीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होती. भारती दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले होते. या सर्व गोष्टींबद्दल बोलताना भारती म्हणाली, 'दुकानदार आमच्या घरी येऊन उधारी मागत असत. ते माझ्या आईचा हात पकडत असत. तेव्हा मला माहित नव्हतं की ते माझ्या आईसोबत गैरवर्तन करत आहेत. एवढंच नाही तर एकानं एकदा आईच्या खांद्यावर हात ठेवला होता. तेव्हा आई त्याला म्हणाली होती. तुला लाज वाटत नाही का? माझी मुलं आहेत, माझ्या पतीचं निधन झालंय आणि तू माझ्याशी असं वागतोयस.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com