बाहूबलीचं लग्न ठरलं, पण देवसेनेशी नाही तर...

bhaubali fame prabhas wedding news going to marry businessman daughter not anushka
bhaubali fame prabhas wedding news going to marry businessman daughter not anushka
Updated on

मुंबई - बाहूबली चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतील उतलेला आणि प्रचंड लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणून प्रभासचे नाव घ्यावे लागेल. बाहुबलीनं त्याला स्टार केलं. तो सुपरहिरो झाला. त्याच्या त्या चित्रपटानं कमाईचे सर्व विक्रम मोडले होते. बाहुबलीच्या पहिल्या आणि दुस-या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. गेल्या काही दिवसांपासून प्रभासच्या लग्नाची चर्चा सुरु होती. तो कुणाशी लग्न करणार, त्याचे वेगळे प्लँनिंग आहे का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरांच्या प्रतिक्षेत प्रभासचे चाहते आहेत.

प्रभासचा सोशल मीडियावर असणारा फॉलोअर्स मोठा आहे. बाहुबलीपासून प्रभास आणि अनुष्का यांच्याविषयी चर्चेला सुरुवात झाली होती. त्या दोघांच्या नात्याला नाव देण्याची सर्वांना घाई झाली होती. प्रभास आणि अनुष्काच्या चाहत्यांनाही त्यांची जोडी आवडली होती. मात्र त्या दोघांनी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगितले आहे. मात्र प्रभासनं आता त्याची नवीन नवरी शोधली आहे. त्याची चर्चा आता सोशल मीडियावर व्हायला लागली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

टॉलीवूडच्या एका रिपोर्टनुसार प्रभास हा यावर्षी कधीही लग्न करु शकतो. मात्र त्याची पत्नी ही अनुष्का शेट्टी नाही. दोघांच्या चाहत्यांची त्यांनी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली होती. प्रभास हा अमेरिकेतील एका मोठ्य़ा बिझनेसमनच्या मुलीशी लग्न करणार आहे अशा चर्चेला उधाण  आले आहे. प्रभासची होणारी बायको ही एका सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची मुलगी आहे. तिच्याशी लग्न करण्याचा प्रभासचा मानस आहे.

थोडक्यात प्रभासचे अरेंज मॅरेज होणार आहे. आता दोन्ही परिवारांचे एकमेकांशी बोलणे सुरु असून लवकरच लग्नाची तारीख ठरणार आहे. यावर्षी प्रभासचा राधे श्याम हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यात त्याच्या जोडीला पूजा हेगडे दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रभास लग्न करणार असल्याची चर्चा आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com