esakal | अमिताभ बच्चन यांच्या 'केबीसी १२'चं पुन्हा सुरु होणार शुटींग, सेटवर सुरु आहे अशी जय्यत तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

kbc 12

नुकतीच अमिताभ बच्चन यांनी कोरोना काळात न्यू नॉर्मलसोबत सेटवरील काही फोटो शेअर केले होते. आणि आता तर केबीसीचा सेट पूर्णपणे तयार आहे आणि याचा नवा लूक देखील समोर आला आहे.

अमिताभ बच्चन यांच्या 'केबीसी १२'चं पुन्हा सुरु होणार शुटींग, सेटवर सुरु आहे अशी जय्यत तयारी

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- प्रसिद्ध गेम शो 'कौन बनेगा करोडपती?'च्या १२ व्या सिझनसाठी प्रेक्षक खुपंच उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी शोचे होस्ट आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने या शूटींगला ब्रेक लागला होता. मात्र आता हळूहळू पुन्हा सगळं पुर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. नुकतीच अमिताभ बच्चन यांनी कोरोना काळात न्यू नॉर्मलसोबत सेटवरील काही फोटो शेअर केले होते. आणि आता तर केबीसीचा सेट पूर्णपणे तयार आहे आणि याचा नवा लूक देखील समोर आला आहे.

हे ही वाचा: सुपरस्टार रजनीकांत यांनी खरेदी केली लॅम्बोर्गिनी कार, किंमत ऐकून डोळे चक्रावतील

सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केबीसी १२ च्या सेटचा पहिला फोटो प्रस्तुत केला आहे. सेट पहिल्यासारखाच निळ्या रंगात उठावदार दिसतोय. यासोबतंच सोनीने हे फोटो शेअर करत म्हटलं आहे, केबीसी १२च्या सेटवर आजपासून बरोबर दोन दिवसांनंतर म्हणजेच ७ सप्टेंबरला शूटींग सुरु केलं जाणार आहे. या सरप्राईजसोबतंच असा अंदाज लावला जाऊ शकतो की आपल्याला लवकरंच केबीसीचे नवीन एपिसोड पाहायला मिळतील.

काही दिवसांपूर्वीच केबीसी १२ चा प्रोमो देखील रिव्हिल केला गेला होता. हा प्रोमो नितेश तिवारी आणि निखित मल्होत्रा यांनी लिहिला होता. याचं कँपेन देखीस नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली सुरु होतं. ज्यामध्ये एका तरुणाने ५०० रुपयांपासून सुरु केलेल्या त्याच्या बिझनेसची कहाणी सांगितली होती.

केबीसीचा हा प्रोमो भावूक करणारा होता त्यामुळे यात अमिताभ देखील हेच म्हणतात की 'सेटबॅकचं उत्तर कमबॅकने द्या.' 'कौन बनेगा करोडपती'चं रजिस्ट्रेशन आणि ऑडीशन लॉकडाऊन दरम्यानंच झालं होतं. हे सघलं ऑनलाईन केलं गेलं होतं. यावेळी कोरोना काळात न्यू नॉर्मलसोबत  खेळ कसा आणि कोणत्या लेवलपर्यंत पोहोचणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.   

kbc 12 first look from set unveiled amitabh bachchan shoot begins from 7 september