Tabu In Bholaa: एका चुकीमुळे धुळीस मिळेल करिअर..'भोला' च्या पोस्टर रिलीज नंतर तब्बू जोरदार ट्रोल Bholaa Movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bholaa tabu look in ajay devgn movie made fans comment on typecasting career in risk

Tabu In Bholaa: एका चुकीमुळे धुळीस मिळेल करिअर..'भोला' च्या पोस्टर रिलीज नंतर तब्बू जोरदार ट्रोल

Tabu In Bholaa: अजय देवगणचा आगामी सिनेमा 'भोला' चं नवीन मोशन पोस्टर रिलीज झालं अन् लगोलग त्याची चर्चा सुरु झाली. या पोस्टरवर बॉलीवूड अभिनेत्री तब्बू पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसत आहे. पोस्टरमध्ये तब्बूचा दमदार लूक दिसत आहे पण चाहते मात्र यानं काही खास इंप्रेस झालेले नाहीत.

उलट बऱ्याच चाहत्यांनी तब्बूला आता ट्रोल करायला सुरुवात केली आहे आणि तिला आता चाहते सल्ले देताना दिसत आहेत. चला जाणून घेऊया काय आहे पूर्ण प्रकरण?(Bholaa tabu look in ajay devgn movie made fans comment on typecasting career in risk)

हेही वाचा: Urfi Javed: हिंदू,मुस्लिम झाले..आता उर्फीनं शीख धर्मियांवर केलं नवं ट्वीट,म्हणाली..

अजय देवगणच्या 'दृश्यम' सिनेमातही तब्बू पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसली होती आणि विजय साळगावकरला पकडण्यासाठी जीवाचा आटापिटा करताना दिसली. 'दृश्यम २' मध्ये देखील ती पोलिस ऑफिसरच्या भूमिकेतच दिसत आहे आणि नुकत्याच रिलीज झालेल्या 'कुत्ते' सिनेमातही तब्बू पोलिस ऑफिसरच्या भूमिकेतच दिसत आहे. यादरम्यान भोलाचा पोस्टर रिलीज केला गेला आणि त्यातही तब्बू पोलिस ऑफिसरचीच व्यक्तीरेखा साकारताना दिसली.

आता चाहत्यांचे म्हणणे आहे की तब्बू सारखं सारखं पोलिस ऑफिसरची भूमिका स्विकारुन मोठी चूक करत आहे. चाहत्यांच्या मते तब्बू स्वतःला एकाच पठडींच्या भूमिकेत बांधून करिअरमध्ये खूप मोठी रिस्क घेताना दिसत आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे की,'पहिल्यांदा विजय साळगावकरचा पाठलाग करताना दिसली आणि आता त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या भोला नावाच्या माणसाचा पाठलाग करतेय'.

हेही वाचा: Arjun Kapoor: सावत्र असली तरी बहिण आहे नं...जान्हवी विषयी असं कसं काय बोलू शकतो अर्जुन कपूर?

आणखी एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे की,'किती सिनेमात पोलिसच बनशील तब्बू'. तर कुणीतरी लिहिलंय,'अजय सर सगळेच सिनेमे तब्बू सोबत बनवत आहात एखादा आपली पत्नी काजोल सोबतही बनवा'. माहितीसाठी सांगतो की 'भोला' हा सिनेमा साऊथचा सुपरहिट सिनेमा 'कैशी' चा हिंदी रीमेक आहे.