Urfi Javed: हिंदू,मुस्लिम झाले..आता उर्फीनं शीख धर्मियांवर केलं नवं ट्वीट,म्हणाली..Urfi Javed On Sikh Religion tweet | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed On Sikh Religion

Urfi Javed: हिंदू,मुस्लिम झाले..आता उर्फीनं शीख धर्मियांवर केलं नवं ट्वीट,म्हणाली..

Urfi javed: आपल्या अतरंगी फॅशन स्टाइलमुळे उर्फी जावेद नेहमी चर्चेत असायचीच पण जेव्हा उर्फीच्या कपड्यावंर राजकीय पक्षांकडून आक्षेप घेतला गेला तेव्हा मात्र जोरदार वाद रंगलेला गेल्या काही दिवसांपासून आपण सगळे पाहत आहोत. चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात रंगलेला वाद थेट महिला आयोगाकडे तक्रार करण्यापर्यंत पोहोचला. यांच्यातील तू-तू,मै-मै नं महाराष्ट्राचं मात्र मस्त मनोरंजन झालं. (Urfi Javed On Sikh Religion)

हेही वाचा: Prasad Oak Video: 'सगळ्या डिग्र्या...सगळं शिक्षण पाण्यात...', कोणावर वैतागला प्रसाद ओक?

चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच त्यांनी उर्फीला कपडे नीट घातले नाहीत आणि सार्वजनिक ठिकाणी तिनं सुरु केलेला नंगा नाच जर थांबवला नाही तर थोबाडीतही मारेन असं म्हटलं होतं. त्यानंतर उर्फीनं तर थेट चित्रा वाघ यांचा 'सासू' म्हणून उल्लेख केला होता. या वादानंतर उर्फीनं पोलिसांकडे धाव घेतली होती आणि पोलिसांनी तिचा जबाबही नोंदवला होता.

हेही वाचा: Shahrukh Khan च्या 'या' एका गुणावर बॉलीवूडचा भाईजान भलताच फिदा, सर्वांसमक्ष कबुली देत म्हणाला...

उर्फी सध्या पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर ट्वीटरवर भलतीच सक्रिय पहायला मिळते आहे. याआधी तिनं हिंदू-मुस्लिम धर्मांसंदर्भात ट्वीट करत खळबळ उडवून दिली होती.

हिंदू धर्माबद्दल ट्वीट करताना उर्फी म्हणाली होती,''प्राचीन काळी हिंदू स्त्रिया अशाप्रकारे पेहराव करायच्या. हिंदू खूप उदारमतवादी होते,शिक्षित होते,ते स्त्रियांना त्यांच्या आवडीचे कपडे निवडण्याची मुभा द्यायचे. महिलांचा खेळात आणि राजकारणात सक्रिय सहभाग असायचा. तेव्हा जा आणि आधी भारतीय संस्कृतीला समजून घ्या''.

तिनं ट्वीटसोबत जुने शिल्प आणि हिंदू स्त्रीयांचा प्राचीन काळातील पेहराव दाखवणारा एक फोटो शेअर केला होता.

हेही वाचा: Urfi Javed सारखेच कपडे घालून आली शर्वरी वाघ..आता काय करतील चित्रा ताई?

हिंदू धर्मानंतर उर्फीनं आपला मोर्चा वळवला होता मुस्लिम धर्माकडे. उर्फी स्वतः मुस्लिम असूनही तिनं मुस्लिम धर्मासाठी खूप कटूता आपल्या ट्वीटमधून व्यक्त केली होती. तिनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं,''मुसलमान पुरुषांना वाटतं की त्यांच्या पत्नीवर त्यांचा मालकी हक्क आहे''.

आता या ट्वीटवरनं सुरु झालेली वादातीत चर्चा थांबत नाही तोवर उर्फीनं शीख धर्माबद्दल ट्वीट केलं आहे. तिनं लिहिलं आहे,''मी मुळीच धार्मिक नाही पण मला गुरुद्वाराची धार्मिक संकल्पना खूप प्रिय आहे. लोकांच्या धर्म,जात,लिंग,रंग,श्रीमंती याची पर्वा न करता त्यांना अन्नदान करणं हे खरंच खूप भावतं. शीख धर्मीय आजही इतक्या भक्तीभावानं लंगर करतात,हे खरंच खूप कौतूकास्पद आहे आणि मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे..''असं उर्फीनं तिच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आता उर्फीनं ट्वीट केलं म्हणजे चर्चा तर व्हायलाच हवी नाही का. तिच्या या ट्वीटवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. 'उर्फी तू अगदी योग्य बोलत आहेस','शीख लोकांबद्दल खूप आदर आहे तुला हे जाणून खूप छान वाटलं', किंवा 'चांगलं माणूस बनण्यासाठी धर्म बदलण्याची गरज नाही ...' अशा अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.