ऑनलाइन रिलीज होणार भुज: प्राइड ऑफ इंडिया

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

आतापर्यंत, अमिताभ बच्चन, आयुष्मान खुरानाच्या गुलाबो सीताबो आणि विद्या बालनच्या शकुंतला देवी: डिजीटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आणि आता तर अजय देवगणचा भुज: प्राइड ऑफ इंडिया ऑनलाईन रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात.

कोरोनाने जगण्याची परिमाणंच बदलली. जिथे जगण्याचा आणि पोटाचाच प्रश्‍न उभा राहतो. तिथे मनोरंजन, संस्कृती या गोष्टींना फारसा अर्थ उरत नाही. त्यामुळे या कोरोना वादळाचा परिणाम एरवी जनतेच्या गळ्यातील ताईत असलेल्या चित्रपटांवरही झाला.
लॉकडाउन जाहीर झाल्यापासून सिनेमागृहात एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. म्हणून निर्मात्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चित्रपटांचे शूटिंग रखडले आहे आणि शूट पुन्हा कधी सुरू होईल याची खात्री नाही. सिनेमा हॉल लवकरच सुरू होणार नसल्याने बऱ्याच चित्रपटांचे निर्माते चित्रपट ऑनलाईन प्रदर्शनाचा पर्याय निवडत आहेत.
आतापर्यंत, अमिताभ बच्चन, आयुष्मान खुरानाच्या गुलाबो सीताबो आणि विद्या बालनच्या शकुंतला देवी: डिजीटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आणि आता तर अजय देवगणचा भुज: प्राइड ऑफ इंडिया ऑनलाईन रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात.
या चित्रपटाच्या शूटिंगसाठी काही दिवस बाकी असले तरी निर्मात्यांना अनलॉकनंतरची परिस्थिती चांगलीच ठाऊक आहे ज्यात नाट्यगृहांतील लोक गर्दीच्या ठिकाणी जाण्याची भीती बाळगू शकतात. हे सर्व लक्षात घेऊन बहुसंख्य निर्मात्यांनी त्यांचे उपक्रम जसे की , चित्रपट , वेब सिरीज इत्यादी ऑनलाईनच प्रदर्शित करण्याचं ठरवलेलं दिसत आहे.
भुज- प्राइड ऑफ इंडिया हा चित्रपट आयएएफ स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिक यांच्या जीवनावर आधारित आहे. भुज- द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटा मध्ये 1971 साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाची कहाणी झाली. त्याच्यासोबत ही फिल्म इंडियन एयरफोर्सची स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिकची कथा सांगते. 1971 च्या युद्धाच्या वेळी जेव्हा इंडियन एअर फोर्स एअर बेस उदध्वस्त झालं होत तेव्हा विजय कर्णिक यांनी त्यांच्या टीम सोबत आपल्या आयएएफ एअरबेसची पुनर्रचना केली होती. या चित्रपटाची कथा या घटनेवर आधारीत आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhuj : Pride of India relesing online