'जगतो मरण्यासाठीच, माझं नाव शिपाई' अजयच्या भूजचा टीझर व्हायरल

या ट्रेलरनं चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे.
bhuj the pride of india
bhuj the pride of india Team esakal

मुंबई - अजय देवगणचा भुज द प्राईड (bhuj the pride of india) नावाचा चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. रविवारी या चित्रपटाचा टीझर (teaser) प्रदर्शित झाला होता. उद्या त्याचा ट्रेलर (trailer) प्रदर्शित होणार आहे. अजयनं यात प्रमुख भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ट्रेलरनं चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे अजयच्या चाहत्यांना या चित्रपटाचे वेध लागले आहे. त्यात अजय हा एका सैनिकाच्या भूमिकेत आहे. बऱ्याच कालावधीनंतर तो पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत वावरताना दिसणार आहे. (bhuj the pride of india teaser ajay devgn sonakshi sinha sharad kelkar-nora-fatehi-amy-virk)

माझ्या मरणाचा कुणीही शोक व्यक्त करु नका. मी माझं बलिदान स्वताच ठरवलं आहे. त्याचा निर्णय मी घेतला आहे. त्यामुळे माझ्या जाण्यावर शोक व्यक्त करण्याचे काही कारण नाही. मी जगतो याचे कारण म्हणजे मला मरायचं आहे. माझं नाव आहे शिपाई. अजयच्या तोंडचा हा संवाद सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यात अजयचा जो लूक आहे. तो भलताच प्रभावी झाला आहे. चाहत्यांची त्याला पसंती मिळताना दिसत आहे.

32 सेकंदाच्या त्या टीझरनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. भुज द प्राईड ऑफ इंडिया चित्रपटानं आता वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे. चित्रपट प्रदर्शित व्हायला अजून एक महिन्याचा कालावधी आहे. मात्र त्या अगोदरच या चित्रपटाच्या टीझरनं प्रेक्षकांना वेड लावले आहे. गेल्या काही दिवसांपासून अजयच्या या चित्रपटाची चर्चा रंगली होती. त्याच्यापूर्वी अक्षयच्या भारतकुमार, पृथ्वीराज, अतरंगी रे, बेलबॉटम आणि सुर्यवंशी नावाच्या चित्रपटानं प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती.

bhuj the pride of india
तेजश्री प्रधानचं स्वप्न पूर्ण झालं; सोशल मीडियावर केली खास पोस्ट
bhuj the pride of india
'तु पहिली सलमानची माफी माग',अर्शीनं केआरकेला सुनावलं

भुज द प्राईड ऑफ इंडिया हा चित्रपट एका भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यावर आधारलेला आहे. त्यात विजय कर्णिक नावाच्या अधिकाऱ्याची कहाणी सांगण्यात आली आहे. आणि ती भूमिका अजयनं साकारली आहे. पाकिस्तान युध्दाच्या वेळी कर्णिक त्या दलाचे प्रमुख होते. त्यांनी माधापार गावातील 300 महिलांची कशाप्रकारे मदत केली, त्यांना संकटातून कसे बाहेर काढले हे त्या चित्रपटातून सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com