esakal | 'तु पहिली सलमानची माफी माग',अर्शीनं केआरकेला सुनावलं
sakal

बोलून बातमी शोधा

actress arshi khan

'तु पहिली सलमानची माफी माग',अर्शीनं केआरकेला सुनावलं

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा भाईजान (bollywood bhaijan) आणि केआरके (krk) अर्थात कमाल राशिद खान (kamal rashid khan) यांच्यातील वाद अद्याप सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे वाद सुरु आहे. सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चाही आहे. न्यायालयानं कमाल खानला याबाबत झापले असताना देखील तो पुन्हा सलमानच्या वाट्याला गेल्याचे बोलले जात आहे. राधे चित्रपटाचा रिव्ह्यु त्यानं केला होता. याशिवाय सलमानच्या बिइंग ह्युमन या एनजीओवर त्यानं भष्ट्राचाराचा आरोप केला होता. आता या प्रकरणात अर्शीनं उडी घेतली आहे. (tv actress arshi khan said kamaal r khan to apologise to salman khan)

बिग बॉस 14 (bigg boss season 14) मध्ये एंट्री घेणारी अर्शी खान (arshi khan) ही नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तिला सलमान बद्दल विशेष आपुलकीही आहे. तिनं ही गोष्ट बिग बॉसच्या दरम्यान सांगितली होती. त्यामुळे सलमानच्या वाट्याला कोणी गेलं तर अर्शी चिडलेली दिसून येते. असाच प्रकार केआरकेच्याबाबत घडला आहे. गेल्या काही दिवसांपासून केआरके त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विधानांमुळे चर्चेत आहे. त्यानं राधे चित्रपटावरुन सलमानला कोंडीत पकडलं होतं.

अर्शीनं कमाल खानला सावध केलं आहे. तिनं त्याला काही करुन पहिली सलमानची माफी मागावी. असं सांगितलं आहे. त्यामुळे तिच्या या वक्तत्यावरुन केआरकेची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अर्शीनं सांगितलं आहे की, केआरकेनं जे काही केलं आहे त्यात त्याला स्वताचा प्रचार करायचा होता. आपल्या प्रसिद्धीसाठी त्यानं हे अशाप्रकारची वक्तव्ये केली आहेत. सलमानला अपमानित करुन आपली प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केआरकेनं केला आहे.

हेही वाचा: 'ती चोर आहे' मृण्मयीचा बहिणीवर आरोप; पहा व्हिडीओ

हेही वाचा: चंकी पांडे यांना मातृशोक; अनन्याला अश्रू अनावर

काही दिवसांपूर्वी केआरकेनं दावा केला होता की, सलमानच्या राधे नावाच्या चित्रपटाचा निगेटिव्ह रिव्ह्यु केल्यामुळे माझ्यावर दावा ठोकण्यात आला होता. त्यावर सलमानच्या वकिलांनी सांगितलं की, केआरकेनं सलमानची बदनामी केली, त्याच्यावर अनेक आरोप केले, त्यामुळे त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. केआरकेच्या युट्युब चॅनेलबाबत काही आक्षेप नोंदवण्यात आले होते.

loading image