esakal | तेजश्री प्रधानचं स्वप्न झालं पूर्ण; सोशल मीडियावर केली खास पोस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

tejashri pradhan

तेजश्री प्रधानचं स्वप्न पूर्ण झालं; सोशल मीडियावर केली खास पोस्ट

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

'होणार सून मी या घरची' आणि 'अग्गं बाई सासूबाई' या मालिकेमधून अभिनेत्री तेजश्री प्रधानला (tejashri pradhan)विशेष लोकप्रियता मिळाली. 'अग्गं बाई सासूबाई' या मालिकेमधील तेजश्रीच्या 'शुभ्रा' या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेला थोड्या कालावधीतच लोकांचे प्रेम मिळाले. 'बबलू बॅचलर' या हिंदी चित्रपटामध्ये देखील तेजश्रीने काम केले. तेजश्रीने नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केले. या पोस्टमध्ये तेजश्रीने तिच्या नव्या निर्मिती संस्थेची घोषणा केली आहे. 'टेक ड्रीम्स प्रोडक्शन' (tek dreams production) असं तेजश्रीच्या निर्मीती संस्थेचं नाव आहे. ही संस्था तेजश्रीने तिची मैत्रिणी कीर्ती नेरकरसोबत सुरू केली आहे.(tejashri pradhan started her production house tek dreams)

मैत्रिणी सोबतचा फोटो शेअर करून तेजश्रीने त्याला कॅप्शन दिले, 'माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी काहीतरी खास आहे. मी आणि माझी मैत्रीण कीर्ती नेरकर नेहमीच काहीतरी वेगळं करण्याबद्दल बोलायचो, आमच्या आवडीचा कन्टेन्ट तयार करण्याबद्दल आणि असं काहीतरी लिहिण्याबद्दल जे जादुई असेल. अखेरीस आमच्या रोज रात्रीच्या बोलण्याला, विचारांच्या देवाणघेवाणीला, कल्पनांना आणि स्वप्नांना एक चेहरा मिळालाय. मला आमचं स्वप्न तुमच्यासमोर सादर करायला प्रचंड आनंद होतोय... आम्ही आमची निर्मिती संस्था 'टेक ड्रीम्स प्रोडक्शन' ची सुरूवात करत आहोत. तुमचा प्रेम आणि आशीर्वाद कायमसोबत असूद्यात.'

हेही वाचा: 'ती चोर आहे' मृण्मयीचा बहिणीवर आरोप; पहा व्हिडीओ

तेजश्रीच्या या पोस्टला कमेंट करून अनेकांनी तिला या नव्या संस्थेसाठी शुभेच्छा दिल्या. ती सध्या काय करते, लग्न पहावे करून, असेही एकदा व्हावे या चित्रपटांमधून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

हेही वाचा: 'प्रेग्नंट आहेस का?' दीपिकाला नेटकऱ्यांचा सवाल

loading image