esakal | Bhuj Trailer: अजयची कमाल,अंगावर येतो काटा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
sakal

बोलून बातमी शोधा

bhuj the pride of india

Bhuj Trailer: अजयची कमाल,अंगावर येतो काटा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - अजय देवगणचा भुज द प्राईड (bhuj the pride of india) नावाचा चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. काल या चित्रपटाचा टीझर (teaser) प्रदर्शित झाला होता. आज त्याचा ट्रेलर (trailer) प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या ट्रेलरची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आपल्या हटके लूक आणि वेगळ्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजयनं या चित्रपटामध्ये एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. अजयनं यात प्रमुख भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ट्रेलरनं चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे.

आता प्रेक्षकांना अजयच्या या चाहत्यांना नव्या चित्रपटाचे वेध लागले आहेत. हा चित्रपट साधारण ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अजयनं यात साकारलेली भूमिका त्याच्या आतापर्यतच्या करिअरमधील वेगळी भूमिका म्हणता येईल. बऱ्याच कालावधीनंतर तो पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत वावरताना दिसणार आहे. (bhuj the pride of india teaser) काल प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये त्याच्या तोंडी एक संवाद दाखवण्यात आला होता. त्यात तो म्हणतो, माझ्या मरणाचा कुणीही शोक व्यक्त करु नका. मी माझं बलिदान स्वताच ठरवलं आहे. त्याचा निर्णय मी घेतला आहे. त्यामुळे माझ्या जाण्यावर शोक व्यक्त करण्याचे काही कारण नाही. मी जगतो याचे कारण म्हणजे मला मरायचं आहे. माझं नाव आहे शिपाई. अजयच्या तोंडचा हा संवाद सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय झाला होता.

भुजच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यात अजयचा जो लूक आहे. तो प्रभावी आहे. चाहत्यांची त्याला पसंती मिळताना दिसत आहे. साधारण 3 मिनिटांच्या त्या ट्रेलरमध्ये त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. भुज द प्राईड ऑफ इंडिया चित्रपटानं आता वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे. चित्रपट प्रदर्शित व्हायला अजून एक महिन्याचा कालावधी आहे. मात्र त्या अगोदरच या चित्रपटाच्या टीझरनं प्रेक्षकांना वेड लावले आहे. गेल्या काही दिवसांपासून अजयच्या या चित्रपटाची चर्चा रंगली होती. त्याच्यापूर्वी अक्षयच्या भारतकुमार, पृथ्वीराज, अतरंगी रे, बेलबॉटम आणि सुर्यवंशी नावाच्या चित्रपटानं प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती.

हेही वाचा: सहा महिन्यांची झाली वामिका; अनुष्काने शेअर केले खास फोटो

हेही वाचा: अर्जुनने सांगितली शाळेतील कटू आठवण; 'नव्या आईवरुन चिडवायचे मित्र'

भुज द प्राईड ऑफ इंडिया हा चित्रपट एका भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यावर आधारलेला आहे. त्यात विजय कर्णिक नावाच्या अधिकाऱ्याची कहाणी सांगण्यात आली आहे. आणि ती भूमिका अजयनं साकारली आहे. पाकिस्तान युध्दाच्या वेळी कर्णिक त्या दलाचे प्रमुख होते. त्यांनी माधापार गावातील 300 महिलांची कशाप्रकारे मदत केली, त्यांना संकटातून कसे बाहेर काढले हे त्या चित्रपटातून सांगण्यात आले आहे.

loading image