
Bhumi Pednekar Boyfriend Video Viral : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भूमि पेडणेकर ही आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ती जिच्यासोबत आहे तो तिचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चा वेगानं व्हायरल होते आहे. भूमिच्या त्या व्हिडिओवरील कमेंट्सही भन्नाट आहेत.
सोशल मीडियावर भूमि पेडणेकर आणि यशचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विरल भयानीच्या इंस्टावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर आलेल्या कमेंटस देखील भन्नाट आहे. काहींनी भूमिला तो खरंच तुझा बॉयफ्रेंड आहे का असा थेट प्रश्न विचारला आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, मला तर हसू आवरत नाहीये, भूमिचा बॉयफ्रेंड म्हटल्यावर मला आश्चर्यच वाटले. अरे हा तर आपला चिंटू आहे. तिसऱ्यानं लिहिलं आहे की, हा आमचा दीपक कलाल आहे.
Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या
यशपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे भूमी....
मीडिया सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यश आणि भूमि गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. ते पाच वर्षांपासून डेट करत असल्याचे बोलले जात आहे. त्याचे वय २८ असून तो एक मोठा उद्योगपती आहे. सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग मोठा आहे. भूमि यशला सोशल मीडियावरुन फॉलो करते.
भूमिच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास काही दिवसांपूर्वी तिचा भीड नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. मात्र तो म्हणावा इतका लोकप्रिय झाला नाही. रकूल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्यासोबत दिसणार आहे. दुसरीकडे यश आणि भूमिच्या रिलेशनशिपबाबत अधिकृतरीत्या कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. त्याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
यापुढील काळात भूमिकडे अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट असल्याचे दिसून येते. त्यात द लेडी किलर, बेशक चित्रपटांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी ती सुधीर मिश्रा यांच्या अफवाह नावाच्या चित्रपटामध्ये देखील दिसली होती. त्यात तिच्या जोडीला नवाझुद्दीनही होता. या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.