Shah Rukh Khan Movie : बॉलीवूडमधला सगळ्यात महागडा अभिनेता! एका चित्रपटाचे राईट्स तो...

शाहरुखच्या पठाणवर टीका करण्यात काही राजकीय पक्ष, संघटना यासगळ्यात जास्त आघाडीवर होत्या.
 Shah Rukh Khan’s Jawan, Dunki’ satellite and digital rights
Shah Rukh Khan’s Jawan, Dunki’ satellite and digital rightsesakal

Shah Rukh Khan’s Jawan, Dunki’ satellite and digital rights : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या पठाणला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानं बॉक्सऑफिसवर प्रचंड कमाई केल्याचे दिसून आले. यासगळ्यात पठाणवरुन झालेला वाद नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असतो. भगव्या रंगाची बिकीनी, चित्रपटाचे कथानक यावरुन शाहरुखच्या चित्रपटावरुन अनेकांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिल्या होत्या.

शाहरुखच्या पठाणवर टीका करण्यात काही राजकीय पक्ष, संघटना यासगळ्यात जास्त आघाडीवर होत्या. प्रत्यक्षात जेव्हा पठाण प्रदर्शित झाला तेव्हा त्याला मिळालेला तुफान प्रतिसाद खूप काही सांगून जाणारा होता. या चित्रपटानं हजार कोटींचा टप्पा पार केल्याचे दिसून आले. शाहरुखनं त्याच्या एका कार्यक्रमामध्ये ज्यांनी पठाणला नावं ठेवली त्यांना माझ्या चित्रपटाच्या कमाईनं उत्तरं दिली आहेत. तेव्हा मला जास्त काही बोलायचे नाही. असे किंग खाननं म्हटले होते.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

 Shah Rukh Khan’s Jawan, Dunki’ satellite and digital rights
Kangana Ranaut : बॉलीवूडच्या क्वीनचा पुन्हा दणका! 'तेजस' चित्रपटाची घोषणा

आता शाहरुखच्या आगामी दोन चित्रपटांनी प्रदर्शनापूर्वीच हवा केली आहे. डंकी आणि जवान अशी त्या चित्रपटांची नावं आहेत. या चित्रपटांचे डिजिटल आणि सॅटेलाईट राईट्स हे कोट्यवधी रुपयांना विकले गेले आहेत. त्याचा आकडा ऐकल्यास झोप उडल्याशिवाय राहणार नाही. या दोन्ही चित्रपटांचे राईट्स हे तब्बल ४८० कोटी रुपयांना विकले गेल्याचे दिसून आले आहे. प्रदर्शनापूर्वीच एवढी मोठी कमाई करणारा शाहरुख हा पहिलाच अभिनेता ठरला आहे.

जवान आणि डंकी चित्रपटानं मोठा टप्पा गाठला आहे. या दोन्ही चित्रपटांची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. त्यात त्यांचे व्हायरल झालेले टीझर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शाहरुखनं तमिळ फिल्ममेकर अॅटलीसोबत जवान नावाचा पॅन इंडिया प्रोजेक्ट करण्याचा विचार केला आणि हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. यानंतर राजकुमार हिरानी यांचा डंकीही रांगेत आहे.

 Shah Rukh Khan’s Jawan, Dunki’ satellite and digital rights
Satyaprem Ki Katha Review: कार्तिक - कियाराची जादू पसरली, ऐन पावसाळ्यात वातावरण रोमँटिक, वाचा review

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवानचे डिजिटल राईट्स हे २५० कोटींना विकले गेले आहेत. तर डंकीचे २३० कोटी रुपये शाहरुखला मिळणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात कोणत्याही चित्रपटाला राईट्स मिळाले नसल्याची चर्चा आहे. जवानचे म्युझिक राईट्स हे टी सीरिजनं तब्बल ३६ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com