स्त्रियांकडे पाहण्याचा पुरुषी दृष्टीकोन बदलतोय : भूमी पेडणेकर

टीम ई सकाळ
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

भूमी पेडणेकर हे नाव अनेकांना माहीत नव्हतं. पण दम लगा के हैशा हा चित्रपट आला आणि यशराज बॅनरमधून एक नवा गुटगुटीत चेहरा इंडस्ट्रीला मिळाला. आता भूमी अक्षयकुमारच्या टाॅयलेट एक प्रेमकथा या चित्रपटातून दिसते आहे. त्यामुळे तिच्याबद्दल अनेक नवनव्या गोष्टी लोकांना कळतायत. त्यातलीच एक अविश्वसनीय बातमी अशी की कमाल आर खान अभिनित आणि दिग्दर्शित देशद्रोही हा चित्रपट भूमीने तब्बल शंभरवेळा पाहिलाय. 

मुंबई : भूमी पेडणेकर हे नाव अनेकांना माहीत नव्हतं. पण दम लगा के हैशा हा चित्रपट आला आणि यशराज बॅनरमधून एक नवा गुटगुटीत चेहरा इंडस्ट्रीला मिळाला. आता भूमी अक्षयकुमारच्या टाॅयलेट एक प्रेमकथा या चित्रपटातून दिसते आहे. त्यामुळे तिच्याबद्दल अनेक नवनव्या गोष्टी लोकांना कळतायत. त्यातलीच एक अविश्वसनीय बातमी अशी की कमाल आर खान अभिनित आणि दिग्दर्शित देशद्रोही हा चित्रपट भूमीने तब्बल शंभरवेळा पाहिलाय. 

भूमीबद्दल फार काही माहीती नसलेल्यासाठी आणखी अनेक नवेनवे किस्से आहेत, भूमी ही यशराज बॅनरच्या कास्टिंग डिरेक्टरकडे असिस्टंट म्हणून काम करत होती. तिने दम लगा के.. साठी आॅडिशन दिली त्यावेळी आपण डमी आॅडिशन देतोय की काय असे तिला वाटत होते. पण त्यानंतर आपली निवड झाल्याचे कळले. अनेकांना माहीत नसेल. याबाबत बोलताना, ती म्हणते, मी ज्यावेळी जाड होते त्यावेळी लोक माझ्याकडे बघत होते. त्यांची नजर वाईट नव्हती. पण मी रजिस्टर होत असे. आता मात्र मी बारीक झाल्यावर लोकांच्या नजरा वेगळ्या कारणासाठी माझ्याकडे वळतात. आता एक नक्की आहे, की स्त्रियांकडे लाेकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो आहे. 

याचवेळी कमाल आर खानचा देशद्रोही हा चित्रपट आपण जवळपास 100 वेळा पाहिल्याची पावतीही तिने दिली. हा सिनेमा इतक्यांदा का मी पाहिला ते माहीत नाही, पण मी तो पाहीला असे ती म्हणते. हे कळल्यानंतर मात्र अनेकांच्या भूवया उंचावल्या. 

Web Title: bhumi pednekar hundred times deshdrohi movie esakal news

टॅग्स