Bhakshak Teaser: सत्य घटनेवर आधारीत भूमी पेडणेकरचा 'भक्षक', सई ताम्हणकर महत्वाच्या भूमिकेत, टिझर बघाच

सत्य घटनेवर आधारित भक्षकचा ट्रेलर रिलीज झालाय
bhumi pednekar sai tamhankar Bhakshak inspired by true events coming on 9th February
bhumi pednekar sai tamhankar Bhakshak inspired by true events coming on 9th February SAKAL

Bhakshak Teaser News: सध्या मनोरंजन विश्वात सत्य घटनांवर आधारित अनेक महत्वपूर्ण सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यापैकीच एक सिनेमा म्हणजे भक्षक.

नुकताच भक्षक सिनेमाचा टिझर भेटीला आलाय. खर्‍या घटनांनी प्रेरित होऊन नेटफ्लिक्सचा आगामी क्राईम ड्रामा भक्षकची सर्वांना उत्सुकता आहे.

bhumi pednekar sai tamhankar Bhakshak inspired by true events coming on 9th February
Koffee With Karan 8: ओरीचा अर्थ काय? तो केसांमध्ये पेन का लावतो? कॉफी विथ करणमध्ये झाला खुलासा

'भक्षक' (Bhakshak) सिनेमात न्याय मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या एका अविचल स्त्रीच्या शोधाचा प्रवास आहे. भूमी पेडणेकर वैशाली सिंगच्या भूमिकेत एका शोध पत्रकाराची भूमिका साकारत आहे. महिलांवरील गुन्ह्यांचे वास्तविक वास्तव समोर आणून एक अक्षम्य गुन्हा उघडकीस आणायचा तिचा प्रयत्न आहे. परंतु तिच्यावर आसपासची व्यवस्था आणि समाजाचा कसा दबाव असतो, याची कहाणी 'भक्षक'मधून बघायला मिळते.

भक्षकमध्ये दिग्गज कलाकार दिसून येत आहेत. भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत आहे. शिवाय संजय मिश्रा, आदित्य श्रीवास्तव हे लोकप्रिय कलाकार पाहायला मिळत आहेत.

विशेष गोष्ट म्हणजे मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर पोलीस अधिकारीच्या महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

“आमचा उद्देश समाजातील कठोर वास्तवांवर प्रकाश टाकणे आणि अर्थपूर्ण बदल घडवून आणणारे संभाषण सुरू करणे हा आहे,” असं भक्षकचा दिग्दर्शक पुलकित म्हणतो.

हा चित्रपट रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रॉडक्शन आहे, पुलकित दिग्दर्शित आणि गौरी खान आणि गौरव वर्मा निर्मित भूमी पेडणेकर, संजय मिश्रा, आदित्य श्रीवास्तव आणि सई ताम्हणकर यांचा भक्षक 9 फेब्रुवारी 2024 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com