esakal | Video : भूषण प्रधानने बाप्पासाठी बनवला मोदक; नेटकऱ्यांकडून कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

Video : भूषण प्रधानने बाप्पासाठी बनवला मोदक; नेटकऱ्यांकडून कौतुक

Video : भूषण प्रधानने बाप्पासाठी बनवला मोदक; नेटकऱ्यांकडून कौतुक

sakal_logo
By
स्वाती वेमूल

उत्तम अभिनयासोबत मराठमोळा भूषण प्रधान Bhushan Pradhan त्याच्या पाककौशल्यासाठी ओळखला जातो. लॉकडाऊनमध्ये त्याने दररोज नवनवीन पदार्थ बनवले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. भूषणच्या विविध रेसिपीजचं कौतुक नेटकऱ्यांनीही केलं होतं. भूषण स्वत: खवय्या असून त्याला कॉलेजच्या दिवसांपासूनच पाककलेची आवड आहे. नुकतंच त्याने घरच्या बाप्पासाठी मोदक Modak बनवला आहे. त्याचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून नेटकऱ्यांसोबतच सेलिब्रिटींकडून त्याला विशेष दाद मिळतेय.

आईसोबत मिळून त्याने हा मोदक बनवला आहे. मोदकाचा आकारही त्याला व्यवस्थित जमला असून त्यावर 'भूषण तू परफेक्शनिस्ट आहेस', अशी कमेंट अभिनेत्री प्रार्थना बेहरेने केली. अभिजीत खांडकेकर, तृप्ती खामकर, गौरव गेरा या कलाकारांनीसुद्धा त्यांचं कौतुक केलं आहे. 'आज पहिल्यांदा एखाद्या मुलाला इतक्या उत्तमरित्या मोदक बनवताना पाहिलंय', अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली.

हेही वाचा: ''केबीसी'मध्ये विचारलेला प्रश्न चुकीचा, उत्तरही चुकीचं'; प्रेक्षकाचा दावा

सोशल मीडियावर #BhushanCooks हा हॅशटॅग वापरून भूषण त्याने बनवलेल्या पदार्थांचे फोटो किंवा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. कुळीथ डोसे, मेथीची भाजी, अंबाडी सुकट- भात असे पदार्थ त्याने लॉकडाउनमध्ये बनवले होते. "कॉलेजच्या दिवसांपासूनच मला विविध पदार्थ करायची आवड होती. आई-बाबा दोघंही ऑफिसला जायचे. त्यामुळे कॉलेजमधून घरी आलो की दोन मिनिटवाले नूडल्स करून मी खायचो. लॉकडाउनमध्ये मला एका कलाकार मित्राकडून कुकींग चॅलेंज मिळालं होतं. तेव्हापासून मी नवनवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतोय", असं तो म्हणाला होता.

loading image
go to top