Big Boss 13 : वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी 'या' अभिनेत्रीने दिला नकार, केला मोठा खुलासा

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

Big Boss 13 : घरामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीला नकार देत, शहनाज सोबतच्या वादावरही दिलं 'या' अभिनेत्रीनं स्पष्टीकरण 

 

मुंबई : बिग बॉसचं तेरावं पर्व सध्या चालू आहे आणि इतर पर्वांपेक्षा हे अधिक चर्चेचं ठरलं आहे. शोचा फॉरमॅट, अफेअर आणि भांडणे यांमुळे अनेकदा हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसतो. घरातील सदस्य सिद्दार्थ शुक्लाची चर्चा होती आता मात्र वाइल्ड कार्ड एन्ट्रीच्या मुद्यावरुन नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. अनेकांची नावे यामध्ये समोर येत असतानाच पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना हिचं नावदेखील चर्चेत होतं. आता मात्र स्वत: हिमांशीने सर्व चर्चांना पुर्णविराम देत याविषयीचा खुलासा केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Himanshi Khurana (@iamhimanshikhurana) on

हिमांशीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट अपलोड केली आहे. त्यामध्ये घरामधील एन्ट्री आणि इतर विषयांवरही खुलासा केला आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य शहनाज गिल आणि हिमांशी यांच्यामध्ये वैर आहे यावरही हिमांशीने मत व्यक्त केलं आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे की, ' गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस 13 च्या विषयी जी चर्चा समोर येत आहे त्याची आज मी अधिरकृत घोषणा करत आहे. मी वाइल्ड कार्ड एन्ट्रीमधून घरामध्ये जाणार नाहीए. माझी आणि बिग बॉसच्या टिमची मिटींग पार पडली होती आणि त्यांना मी वाइल्ड कार्ड एन्ट्रीमधून घरामध्ये यावं असं वाटत होतं. पण, त्यावेळी त्यांनी समोर ठेवलेले नियम, कायदे आणि अटी माझ्या तत्वांच्या चौकटीबाहेर होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 final announcement Swipe next

A post shared by Himanshi Khurana (@iamhimanshikhurana) on

पुढे ती म्हणाली, 'आता या शोचे नियम बदलले आहेत आणि मी घरामध्ये एन्ट्री करावी अशी त्यांची इच्छा आहे. पण, माझ्याकडे असणाऱ्या प्रोजेक्ट, काम आणि व्यस्त शेड्युलमुळे मी या शोमध्ये भाग घेऊ शकत नाही.  हनाज आणि तिच्या एकुणच वांदावर तीने स्पष्टीवरण देताना लिहिलं, 'मीडियाने तिच्यासोबत (शहनाज) आणि माझी स्टोरी प्रकाशित केली. माझ्या गाण्याती खिल्ली उडवली पण त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Outfit @hinabhullarofficial 

A post shared by Himanshi Khurana (@iamhimanshikhurana) on

हिमांशीने नकार दिला आहे हे आता सर्वंसमोर आलं आहे. मात्र वाइल्ड कार्ट एन्ट्रीसाठी मग कोण घरामध्ये प्रवेश करणार याची उत्सुकता प्रेक्षकांध्ये आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big Boss 13 this actress have finally spoke about wild card entry