' मम्मी मी लग्नं कधी करु' : आईनं सांगितले की...

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 7 January 2021

टीव्ही रियॅलिटी शोमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा बिग बॉस 14  सीझन आणखी हिट होणार आहे. त्यात आता लवकरच फॅमिली एपिसोड पाहायला मिळणार आहे.

मुंबई - बिग बॉस मधील स्पर्धक आणि इंडियन आयडॉल फेम राहूल वैद्य आता चर्चेत आला आहे. त्याचं कारणही गोड आहे. आता तो लग्न करणार असून सोशल मीडियावर ही गोष्ट व्हायरल झाली आहे. यावर त्याला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इंडियन आयडॉलमध्ये सर्वांच्या पसंतील उतलेला गायक राहुल वैद्य बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. त्याने बिग बॉसच्या घरात राहून त्याची मैत्रिण दिशा परमारला थेट लग्नाची मागणी घातली होती. त्यामुळे तो ट्रेंड झाला होता.

टीव्ही रियॅलिटी शोमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा बिग बॉस 14  सीझन आणखी हिट होणार आहे. त्यात आता लवकरच फॅमिली एपिसोड पाहायला मिळणार आहे. अभिनव शुक्ला, निक्की तांबोळी आणि राहुल वैद्यच्या या परिवातून त्याला भेटण्यासाठी कोणी येणार आहे. आणि ते त्याच्यासाठी मोठं सरप्राईज ठरणार आहे. ते गिफ्ट नक्की काय असणार हे जाणून घेण्यासाठी राहुलही उत्सुक झाला आहे. राहुलची आई आता बिग बॉसच्या घरात इंट्री करणार आहे. त्यावेळी राहुल विचारणार आहे की, आई मी लग्न कधी करु ? बिग बॉसचा हा एपिसोड प्रेक्षकांसाठी एक आगळी वेगळी ट्रीट असणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SHOW (@_unseen.undekha_)

राहुलनं त्याच्या आईला जे उत्तर दिलं आहे त्यासाठी हा एपिसोड पाहावा लागणार आहे. राहुलच्या आईनं सांगितले की, आम्ही तर लग्नाची तयारी सुरु केली आहे. मोठ्या कालावधीनंतर राहुल आईला भेटत असल्यानं यावेळी तो थोडा इमोशनलही झाला होता. त्याचवेळी निक्की तांबोळीची आईही आल्यानं दोघी रडत असल्याचेही या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. इतकेच नव्हे तर एजाज खानचा भाऊही त्याला भेटायला येणार आहे.  याविषयी राहुलनं सांगितले की, मी यापूर्वी कधीही इतका अस्वस्थ नव्हतो जेवढा आता झालो आहे. दिशा आणि मी एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखत आहोत. तु आता माझ्याशी लग्न करशील का, मी तुझ्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे. यावेळी राहुलनं हातात अंगठी घेऊन दिशाला प्रपोझ केले होते. असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

राहुलच्या आईनं राहूलच्या मैत्रिणीचं कौतूक केलं होतं. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली होती. त्यात त्या म्हणाल्या, मला खरच आनंद झाला आहे.  राहुलने अचानक त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी विचारले आणि ते पाहून आम्ही सगळे आनंदी झालो. ती खूप चांगली मुलगी आहे. बाकी गोष्टींवर मी सध्या काही बोलू शकत नाही. दिशा परमार ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. ‘प्यार का दर्द है, मीठा मीठा प्यारा प्यारा’,’वो अपनासा’ या भूमिका तिने साकारल्या आहेत. 

'स्वप्नील होता, सायशा झाली; दीपिका, करिनानं केलं कौतूक'

यंदा बिग बॉसचा 14 वा सीझन जोरदारपणे सुरु आहे. त्यात सहभागी झालेले कलाकार त्यांच्यातील वाद, भांडणे त्यामुळे बिग बॉसचा टीआरपी सतत वाढत असतो. शो मध्ये सहभागी होणारे स्पर्धक, त्यांच्यातील वाद यामुळे या शो ला प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big boss fame rahul vaidya get married mother meets rahul bigg boss 14 house