'स्वप्नील होता, सायशा झाली; दीपिका, करिनानं केलं कौतूक'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

आपण जसे आहोत तसे स्वीकारण्याची ताकद फार कमी जणांकडे असते. त्यासाठी फार मोठी किंमतही मोजावी लागते. अंगी धाडसं असावं लागतं. आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे जगाशी लढण्यासाठी कणखर मनोबल. याशिवाय पुढचा प्रवास काही सोपा होत नाही. जगात अशी अनेक उदाहरणे सांगता येतील की ज्यांनी आपल्या आयुष्याच्या सुरुवातीचा काळ हा एका रुपात व्यतीत केला आणि उत्तरार्ध दुस-या रुपात.

मुंबई - आपण जसे आहोत तसे स्वीकारण्याची ताकद फार कमी जणांकडे असते. त्यासाठी फार मोठी किंमतही मोजावी लागते. अंगी धाडसं असावं लागतं. आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे जगाशी लढण्यासाठी कणखर मनोबल. याशिवाय पुढचा प्रवास काही सोपा होत नाही. जगात अशी अनेक उदाहरणे सांगता येतील की ज्यांनी आपल्या आयुष्याच्या सुरुवातीचा काळ हा एका रुपात व्यतीत केला आणि उत्तरार्ध दुस-या रुपात. अशीच एक गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. 

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि करिना कपूर यांच्या डिझायनरनं नुकतेच लिंग परिवर्तन करुन घेतलं आहे. लहानपणापासून आपल्याला ज्या वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागले ते कमालीचे वेदनाकारक आणि क्लेशकारक असल्याचे त्यानं सांगितले आहे. त्याच्या नव्या प्रवासाला या दोन्ही अभिनेत्रींनी शुभेच्छा देऊन त्याच्या निर्णयाला पाठींबाही दिला आहे.  बॉलीवूडमधील अव्वल डिझायनर म्हणून प्रसिध्द असणा-या स्वप्नील शिंदेची गोष्ट समोर आली आहे. आतापर्यत जग काय म्हणेल या भीतीपोटी स्वतची ओळख लपवून ठेवणा-या स्वप्नीलनं शेवटी आपल्याला काय महत्वाचे वाटते याचा विचार करुन एक धाडसी पाऊल उचलले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या अनेक वर्षांपासून स्वप्नील हा स्वतला चूकीचा समजत होता. विनाकारण दोष देत होता. आता तो स्वप्नील नव्हे तर सायशा झाली आहे. त्याच्या या नव्या नामकरणाला सोशल मीडियातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्वप्नीलची ओळख सांगायची झाल्यास त्यानं दीपिका बरोबरच, करिना, अनुष्का, सनी लिओनी, कॅटरीना कैफ, श्रध्दा कपूर आणि कियारा अडवाणी यांचा डिझायनर म्हणून काम केले आहे. आता सायशानं सोशल मीडियावर आपल्या लिंगपरिवर्नाची माहिती जगजाहिर केली आहे. 

बापरे! एवढ्या कोटींमध्ये विकले गेले सलमान खानच्या 'राधे' सिनेमाचे हक्क

सायशा आपल्या नव्या रुपालविषयी म्हणाली की, लहानपणापासून मला मुले खूप त्रास देत असत. त्यामुळे मी खूप त्रासून गेले होते. वयाच्या २० वर्षापासून मी माझ्यातील सत्याला स्वीकारलं. आणि जे आहे त्याचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. यातील अनेक वर्षे मला मी गे आहे हे समजून सांगण्यासाठी खर्च करावी लागली. आता सहा वर्षांनंतर मला असे जाणवले की मी गे नाही तर एक ट्रान्सवुमन आहे ते. यासगळ्याचा मी स्वीकार केला आहे.  यावर बॉलीवूडमधल्या अनेक अभिनेत्रींनी सायशाचं कौतूक केले आहे. सनीनं लिहिलं आहे की, आय लव यु, मला तुझा अभिमान वाटतो. जे तुला नेहमी व्हावंसं वाटत होतं ते तु आता झाली आहेस. तुला जन्मदिनाच्या खूप सा-या शुभेच्छा.

हॉलीवूड स्टार किम कार्दशिअन पती कान्ये वेस्टसोबत घेणार घटस्फोट, कित्येक महिन्यांपासून राहत आहेत विभक्त

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: famous bollywood designer swapnil shinde transwoman saisha shares photo social media