'साहेब 30 हजार रुपये किलोचे मशरुम खातात, शेतक-यानं बिर्याणी खाल्ली तर'... 

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 1 December 2020

गेल्या काही दिवसांपासून कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत आहेत. त्यासाठी शेतकरी दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर धरणे दिली जात आहेत.

मुंबई - देशातल्या शेतक-यांनी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं होताना दिसत आहेत. बळीराजा रस्त्यावर उतरला आहे. नव्या शेतकरी कायद्याला विरोध करताना शेतक-यांनी जो एल्गार केला आहे त्याचे सोशल मीडियातून तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. अशातच काही सेलिब्रेटींनी याप्रकरणी केंद्र सरकारवर तोफ डागण्यास सुरुवात केली आहे. बिग बॉसमधील एका माजी स्पर्धकानं पंतप्रधानावर केलेली टीका सगळ्यांच्या चर्चेचा विषय आहे.

बिग बॉसचा एकेकाळचा स्पर्धक असलेल्या तहसीन पूनावाला याने मोदींवर जहरी टीका केली आहे. त्याने मोदींना ते खात असलेल्या मशरुमवर लक्ष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत आहेत. त्यासाठी शेतकरी दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर धरणे दिली जात आहेत. 

हे ही वाचा: बिग बॉस १४: रुबिना दिलैकचा पती अभिनवसोबत यावर्षीच होणार होता घटस्फोट...  

आम्ही कुठल्याही अटीविना सरकारशी बोलणी करायला तयार आहोत असे शेतक-यांचे म्हणणे आहे. सरकारनं अद्याप कोणतीही दखल घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. अशात पूनावाला यांनी मोदींवर कडाडून टीका केली आहे.

पूनावालाने सतत शेतक-यांच्या प्रश्नावरुन मोदींना धारेवर धरले आहे. त्याने नुकतेच मशरुम प्रकरणावर व्टिट केले आहे. त्याने आपल्या व्टिटमध्ये लिहिले आहे की, आपल्या सर्वांचे साहेब हे मॉरेल मशरुम रोज खातात. ज्याची किंमत 30 हजार रुपये किलो आहे.

‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूरने थाटामाटात बांधली तिर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ

दुसरीकडे एखादा गरीब शेतकरी बिर्याणी (त्याच्यात तांदुळ, हिरवी मिर्ची, टॉमेटो असते) खातो त्यावेळी त्याला टोमणे मारले जातात. विशेष म्हणजे त्या बिर्याणीला लागणारे सगळं शेतकरीच पिकवतो. त्यालाच आता डावललं जात आहे. 'गजब फकीर है न्यू इंडिया वाला बाबा!' अशा शब्दांत त्यानं मोदींना डिवचलं आहे.

तेहसीनच्या या व्टिटवर एका युझर्सनं असे लिहिले आहे की, मोदी यांचे मासिक वेतन हे 2 लाख 80 हजार इतके आहे. त्यामुळे ते त्यांना जे परवडेल असे मागवत असतात. यावर पूनावालाने त्या युझर्सला असे सांगितले, त्यांना मिळणारे वेतन हे नेमकं कुठल्या निकषात बसणारे आहे हे कळायला हवे. कामगिरी पाहून जर वेतन दिले जात असेल तर एवढं वेतन देण्याची गरज नाही. आपल्या देशाच्या तिजोरीवरचा भार त्यानिमित्तानं कमी होईल असे सांगावेसे वाटते. 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big boss fame tehseen poonawala tweet against pm modi