Big Boss Marathi 4: मांजरेकरांना बिग बॉसच्या घरात हवेयत संजय राऊत, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss Marathi 4, Mahesh Manjrekar on Sanjay Raut

Big Boss Marathi 4: मांजरेकरांना बिग बॉसच्या घरात हवेयत संजय राऊत, म्हणाले...

Big Boss Marathi 4: बिग बॉस हा एक असा रिअॅलिटी शो आहे ज्याचा प्रत्येक सिझन गाजतो. मग तो हिंदीत असो की मराठीत. हिंदीत सलमाननं या शो ला एका उंचीवर नेऊन ठेवलंय तर मराठीत महेश मांजरेकर यांनी. प्रत्येक सिझनमध्ये येणारे स्पर्धक जो धुमाकूळ घालतात त्याचे धमाके शो च्या टीआरपीला चढत्या ग्राफवर ठेवतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही.

असो तर आता हिंदी आणि मराठी दोन्ही बिग बॉस अनुक्रमे १ ऑक्टोबर,२०२२ आणि २ ऑक्टोबर,२०२२ पासून चाहत्यांच्या भेटीस येतायत. छोट्या पडद्यावर धमाके सुरु होण्याआधीच आता मराठी बिग बॉसचे होस्ट महेश मांजरेकर यांनी मुलाखतीतून काही ठसकेदार विधानं केली आहेत,ज्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. चक्क संजय राऊत यांचं नाव मांजरेकरांनी बिग बॉस मराठीशी जोडत एक मोठं विधान केलं आहे. काय म्हणालेयत मांजरेकर? बातमीत लिंक जोडलेली आहे, महेश मांजरकेर यांची मुलाखत पाहता येईल.(Big Boss Marathi 4, Mahesh Manjrekar on Sanjay Raut)

मराठी बिग बॉसचा नवा सिझन, सिझन ४ लवकरच म्हणजे येत्या २ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. रणशिंग फुंकलं गेलंय, स्पर्धकही लढण्यास सज्ज आहेत...बिग बॉसचं घर नव्हे लढाईचं मैदानच म्हणूया नं त्याला ,ते देखील तयार झालंय...आता फक्त रिंगमास्तर मांजरेकरांनी इशारा दिल्यानंतर खेळ सुरु व्हायचा बाकी आहे. घरात स्पर्धक कोण असणार यावरनं अंदाज वर्तवले जात असले तरी अंतिम यादी समोर यायची आहे. पण त्याआधीच 'ईसकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत मांजरेकरांनी आपल्याला हव्या असलेल्या काही खास राजकीय नेत्यांची नावं घेत बिग बॉसच्या घरात त्यांना स्पर्धक म्हणून आपल्याला पहायला आवडेल असंही म्हटलं आहे.

हेही वाचा: 'Madhubala आणि दिलीप कुमार यांच्यातील नातं प्लीज...', बायोपिकनं वाढवलं बहिणीचं टेन्शन

बिग बॉसच्या घरात आपल्याला संजय राऊत यांना स्पर्धक म्हणून पहायला आवडेल असं महेश मांजरेकर म्हणाले आहेत. बरं इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांना आपल्याला बिग बॉसच्या घरात गेम खेळताना पहायला का आवडेल याचं देखील उत्तर मांजरेकरांनी दिलं आहे. ते म्हणाले, ''मला बिग बॉस मराठीच्या घरात राजकीय नेते संजय राऊत यांना पहायला आवडेल. सध्या ते 'आत' आहेत,अन्यथा मला नक्कीच त्यांना बिग बॉसच्या घरात पहायला आवडलं असतं. त्यांच्यात एक युनिकनेस आहे जो बिग बॉसचा खेळ खेळण्यासाठी हवा. आणि ते सामिल झाले असते तर त्यांनी धमाका केला असता. आणखीनही राऊतांमधले बरेच गुण मांजरेकरांनी सांगितलेयत पण त्यासाठी वर मुलाखतीची लिंक जोडलीय ती नक्की ऐका.