आलिया भटच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाविषयी मोठी अपडेट; वाचा सविस्तर... 

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 9 June 2020

महाराष्ट्र सरकारने काही नियम आणि अटींनुसार चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे काही प्राॅडक्शन हाऊसेस चित्रीकरणाबाबत विचारविनिमय करीत आहेत. चित्रपट संघटनाही त्याबाबतीत सक्रिय झाल्या आहेत.

मुंबई : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. चित्रीकरण आणि चित्रपटगृहे बंद करण्यात आली. लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे बिग बजेट चित्रपट तसेच मालिकांचे उभारलेले सेट्सचे काय होणार असा प्रश्न विचारला जात होता. काही जणांनी पावसाळा तोंडावर आल्यामुळे आपला सेट तोडण्याचा निर्णय घेतला. 

वाचा ः सोनू सूद आणि उद्धव ठाकरे यांच्यात 'त्या' रात्री मातोश्रीवर काय झाली होती चर्चा? वाचा...

निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या सेटबाबतही उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता तो सेट तोडण्यात येणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. सरकारने चित्रीकरणाला काही अटी आणि नियमांद्वारे परवानगी दिल्यामुळे तेथे लवकरच चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे.

वाचा ः धक्कादायक! मुंबई महापालिका उपायुक्तांचं कोरोनानं निधन...

महाराष्ट्र सरकारने काही नियम आणि अटींनुसार चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे काही प्राॅडक्शन हाऊसेस चित्रीकरणाबाबत विचारविनिमय करीत आहेत. चित्रपट संघटनाही त्याबाबतीत सक्रिय झाल्या आहेत. गोरेगाव येथील चित्रनगरीत मालिका आणि चित्रपटांचे सेट उभारलेले आहेत. गंगूबाई काठियावडी या चित्रपटाचा सेट चित्रनगरीत उभारलेला आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे सेटची अतिशय काळजी घेण्यात येत आहे. संपूर्ण सेटला ताडपत्रीचे आच्छादन घालून झाकण्यात आले आहे. तेथे दहा ते बारा कर्मचारी काम करीत आहेत आणि सेटची पुरेपूर काळजी घेत आहेत. 

वाचा  ः मन हेलावणारी बातमी! मृत्यू दाखला देण्यास नकार, तब्बल 16 तास मृतदेह घरात

हा सेट कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे आणि लाकडाऊनमुळे तो तोडण्यात येईल असेच सगळे जण खासगीत बोलताना सांगत होते. परंतु आता तो सेट तोडण्यात येणार नाही. अभिनेत्री आलिया भट या चित्रपटात मुख्य भूमिका साकारीत आहे. काही चित्रीकरण बाकी आहे आणि आता ते लवकरच करण्यात येईल.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big decision about alia bhats starer gangubai kathiyawadi