अनुप जलोटा व जसलीन मथारूचं झालं ब्रेकअप!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

मुंबई : पासष्ट वर्षीय भजनसम्राट अनुप जलोटा व त्याची 28 वर्षांची गर्लफ्रेण्ड जसलीन मथारू यांची प्रेमकहाणी चर्चेत आली होती. परंतु, काही दिवसांमध्येच 'बिग बॉस 12'मधील एका टास्कमुळे त्यांचं ब्रेकअप झाले आहे. बिग बॉसमधील सर्वात लोकप्रिय जोडी या आठवड्यात वेगळी होणार आहे. खुद्द अनुप जलोटाने याचा खुलासा केला आहे.

मुंबई : पासष्ट वर्षीय भजनसम्राट अनुप जलोटा व त्याची 28 वर्षांची गर्लफ्रेण्ड जसलीन मथारू यांची प्रेमकहाणी चर्चेत आली होती. परंतु, काही दिवसांमध्येच 'बिग बॉस 12'मधील एका टास्कमुळे त्यांचं ब्रेकअप झाले आहे. बिग बॉसमधील सर्वात लोकप्रिय जोडी या आठवड्यात वेगळी होणार आहे. खुद्द अनुप जलोटाने याचा खुलासा केला आहे.

अनुप जलोटा व जसलीन मथारू या दोघांमध्ये ब्रेकअपची सुरुवात या आठवड्यात घरातील सदस्यांनी दिलेल्या नॉमिनेशन टास्कने झाली. या टास्कमध्ये सिंगल सदस्यांना जोडीपैकी एकाचं अपहरण करायचं होतं. त्याला सोडण्यासाठी अपहरणकर्ते कोणतीही अट ठेवू शकत होते. त्यांच्या मागण्या पूर्ण करुन आपल्या जोडीदाराला वाचवू शकतो किंवा मागण्या पूर्ण न झाल्याने सिंगल सदस्य पुढच्या नॉमिनेशनपासून सुरक्षित होऊ शकतो. या टास्कमध्ये अपहरणकर्ते बनलेल्या दीपिका आणि नेहा, अनुप-जसलीनच्या जोडीपैकी अनुप जलोटा यांचे अपहरण करतात. त्यांना सोडवण्यासाठी जसलीनसमोर कपडे, मेकअपचं साहित्य आणि केस कापण्याची मागणी करतात. परंतु जसलीन असं काही करण्यास तयार नाही. यामुळे नाराज अनुप जलोटा तिच्या नाराज झाले आहेत. अनुप माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, पण कपडे आणि मेकअपही तेवढेच खास असल्याचं जसलीन म्हणाली.

जसलीनने हे साहित्य देण्यास नकार दिल्यानंतर अनुप जलोटा नाराज झाले. "या शोमध्ये मी जसलीनच्या हट्टामुळे आलो. जर तिला कपडे आणि मेकअप साहित्याचा मोह सोडता येत नाही, तर हे नातं आणखी पुढे नेण्यात काहीच अर्थ नाही. आता मी एकटाच आहे आणि ही जोडी तोडत आहे. टास्कमध्ये माणुसकीचा शोध लागतो. जर हा टास्क मला दिला असता, तर मी माझे सगळे कपडे आणून ठेवले असते. टास्कमध्ये कपडेच द्यायचे होते, जीव तर नाही. मी निर्णयावर ठाम असून तो आता कोणीही बदलू शकत नाही,' असे अनुप जलोटा म्हणाले.

दरम्यान, अनुप जलोटा आणि जसलीन मथारु हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. परंतु, त्यांच खरंच ब्रेकअप होणार आहे का? हे पुढील भागात कळू शकेल.

भजनसम्राट अनुप जलोटा व जसलीन मथारू यांच्या वयामध्ये 37 वर्षांचे अंतर आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून ते रिलेशनशीपमध्ये आहेत. प्रीमियर एपिसोडमध्ये बिग बॉसच्या व्यासपीठावर अनुप जलोटा यांनी सर्वांना आश्‍चर्याचा धक्का देत प्रथमच त्यांनी जसलीन गर्लफ्रेण्ड असल्याचे मान्य केले. बिग बॉसच्या घरामध्ये दोघांनी प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर दोघांबाबात चर्चा सुरू झाली आहे.

बिग बॉसच्या बाराव्या मोसमाचा भाग बनून अनुप जलोटा यांनी एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. अनुप जलोटा हे बिग बॉसच्या आतापर्यंतच्या सर्व मोसमातील सर्वाधिक मानधन घेणारे स्पर्धक ठरले आहेत. त्यांना प्रत्येक आठवड्याला 45 लाख रुपये मानधन दिले जाणार आहे. याआधी बिग बॉसमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत टीव्ही अभिनेत्री हिना खान हिचे नाव पहिल्या स्थानी होते. तिला आठवड्याला 40 लाख रुपयांचे मानधन दिले जात होते. हिना खान अकराव्या मोसमात बिग बॉसची स्पर्धक होती.

जसलीनचा जन्म मुंबईमधील असून, ती गायक व अभिनेत्री आहे. तिने प्रसिद्ध गायक मिका सिंग सोबत तिन वर्ष गायक म्हणून काम केले आहे. अनुप जलोटा हे प्रसिद्ध भजनसम्राट असून, त्यांचे विविध ठिकाणी कार्यक्रम होत असतात. अनुप जलोटा यांच्याकडे जसलीन गायनाचे धडे घेत होती. यावेळी दोघांमध्ये मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले, याबद्दलची माहिती दोघांनी बिग बॉसच्या स्टेजवर दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bigg Boss 12 Anup Jalota to break up with rumoured girlfriend Jasleen Matharu