Big Boss 13
Big Boss 13

Bigg Boss 13 : रागाच्याभरात सलमान सोडून गेला बिग बॉस शो !

मुंबई : बिग बॉसच्या शोमध्ये कधी काय होईल हे सांगता येणार नाही. सतत कोणत्या ना कारणाने हा शो चर्चेचा विषय ठरतो. घरातील सदस्यांची भांडणे, अफेअर, शोमधील टास्क आणि शोचा एकुण फॉरमॅट यामुळे यावेळेचं पर्व खास चर्चेमध्ये आहे. या शोचा होस्ट आणि प्रेक्षकांचं आकर्षण असलेला सलमान हा प्रत्येक रविवारी घरातील सदस्यांच्या भेटीला येतो. त्यावेळी तो आठवड्यातील घडलेल्या गोष्टी यांवर चर्चा करतो आणि त्याचसोबत सदस्यांचा क्लासही घेतो. या आठवड्यात मात्र चित्र काही वेगळचं होत आणि त्यामुळे चालू शोमधून सलमान रागाने निघून गेला. जाणून घ्या नक्की कोणत्या कारणाने सलमानने टोकाचं पाऊल उचललं. 

खरंतर 'विकेंड का वार' रविवारी असतो आणि याच दिवशी सलमान घरातील सदस्यांची भेट घेतो. पण, रविवारी 'आयफा अवार्ड 2019' ऑन एअर असल्याने रविवारचा बिग बॉसचा एपिसोड आज रात्री दाखविण्यात येणार आहे. कलर्स टिव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आजच्या एपिसोडचा टिझर अपलोड केला आहे. आज घरातील एक किंवा दोन सदस्यांना 'बेघर' करणार आहे. मात्र कोण्या एका सदस्यावर प्रचंड नाराज सलमान चक्क शोमधून निघून जातो. 

या व्हिडीओमध्ये एका महिला सदस्याला म्हणतो,' तुम्ही हा शो गंमत समजुन खेळत आहात का? हे सिरियस आहे'. पुढे सलमान जोरात ओरडत आणि रागाच्या भरात शोमधून निघून जाताना म्हणतो, 'कोणी दुसऱ्यालाच हे करायला सांगा'. याचा अर्थ असा होतो की, कोणी दुसऱ्या व्यक्तीला हा शो होस्ट करायला सांगा असे सलमान रागाने उद्देशून म्हणतो. त्यानंतर सलमान रागातच आपला कोट फेकत स्टेजवरून खाली येत निघून जाताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

याआधी सलमानने बरेचदा रागाच्या भरात सदस्यांचा क्लास घेतला आहे मात्र कधी शो सोडून जाण्याचे टोकाचे पाऊल उचलले नाही. खरचं सलमान शो सोडून जातो का? आणि गेला तर कोणत्या कारणाने ? आणि कोणता सदस्य आज घरातून जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली. नक्की काय घडणार आहे हे जाणून घ्यायला आजचा एपिसोड पाहावाच लागेल! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com