
Big Boss 13 : या सिझनमध्ये याआधी न झालेल्या गोष्टी घडत आहेत. आता गेममध्ये नवा ट्विस्ट येणार आहे. घराबाहेर गेलेली एक सदस्य पुन्हा एकदा घरामध्ये एन्ट्री करणार आहे. जाणून घ्या कोण आहे ती व्यक्ती ?
मुंबई : 'बिग बॉस' 13 सीजनला मोठा प्रतिसाद मिळत आहे. बिगबॉस आणि सलमान खान हे समीकरण म्हणजे फुल एन्टेंरटेन्टमेंट. प्रेक्षकांना बिगबॉसचा होस्ट म्हणून सलमान खान यालाच पाहायला आवडते. सलमानने जवळपास 10 सिझन बिगबॉस होस्ट केले आहे. बिग बॉसच्या घरात कधी काय होईल हे सांगता येणार नाही. घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने ड्रामा हा होतच असतो. पण, या सिझनमध्ये याआधी न झालेल्या गोष्टी घडत आहेत. आता गेममध्ये नवा ट्विस्ट येणार आहे. घराबाहेर गेलेली एक सदस्य पुन्हा एकदा घरामध्ये एन्ट्री करणार आहे. जाणून घ्या कोण आहे ती व्यक्ती ?
साराने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ, तिला ओळखणेही कठीण
बिग बॉसच्या घरामध्ये प्रत्येक आठवड्यात काहीना काहीतरी टास्क होत असते. घरातील प्रत्येक सदस्य जरी स्वतंत्र जिंकायला आला असला तरी मात्र घरामध्ये त्याचा कोणीतरी मित्र किंवा साथीदार होतोच. शिवाय यावेळेचा सिझन हा पार्टनर आणि कनेक्शनवर आधारीत आहे. याच संबंधी एक टास्क घरातील सदस्यांना देण्यात आले होते. यामध्ये घरातील सदस्यांची त्यांच्या कनेक्शनची परिक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे या आठवड्याला 'कनेक्शन विक' असं नाव देण्यात आलं आहे. याच टास्क अंतर्गत घरातून बाहेर गेलेली एक सदस्य परतणार आहे.
रिंकू मराठीतील सर्वात महागडी अभिनेत्री, मानधन वाचून व्हाल थक्क
शेफाली जरीवाला पारस छाबडासोबत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा शेफाली घरामध्ये दिसणार आहे. शेफाली पुन्हा घरामध्ये एन्ट्री केल्यावर काय गेम खेळते याची उत्सुकता चाहत्यांमध्ये लागून आहे. घराबाहेर गेलेली शेफाली पुन्हा घरामध्ये येणार असल्याने मनोरंजनाची ट्रीट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
हा आठवडा चाहत्यांसाठी नक्कीच खास असणार आहे. नवीन ट्विस्ट आणि हंगामा घरामध्ये होणार आहे. कश्मीरा शाहची एन्ट्री होणार असून जोरदार हंगामा होणार असल्याचं बोलंल जात आहे. त्यामुळे घराबाहेर गेलेल्या सदस्यांच्या घरवापसीमुळे घरात पुन्हा काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आठवड्याच्या शेवटी सलमान या सद्स्यांचा काय क्साल घेणार हेदेखील पाहण्यासारखे असेल.