
बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या मानधनाची चर्चा तर नेहमीच होते. कोणती सेलिब्रिटी किती पैसे घेते हे अनेकदा समोर आले आहे. पण, मराठी कलाकारांची चर्चाही आता होत आहे आणि यामध्ये आणखी एका नावाची चर्चा आहे ती म्हणजे रिंकूची.
मुंबई : 'आर्ची' हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्य़ात पोहोचलं आहे. 'सैराट' या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राला झिंगाट केलं. यामधील आर्चीची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना भावली. पहिल्याच सुपरहिट चित्रपटाने आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुला घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर ही रिंकू चित्रपटातून झळकली. काही दिवासांपूर्वी तीने 'धडक' फेम जान्हवी कपूरची भेट घेतली आणि चर्चेचा विषय ठरली. रिंकूचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मेकअप' असं त्या चित्रपटाचं नाव आहे. रिंकूचं मानधन वाचून तुम्हीही व्हाल थक्क.
वाचा : प्रियांकाचा 'तो' हॉट ड्रेस, 20 वर्षांपूर्वीची 'या' अभिनेत्रीची फॅशन
रिंकूने आजवर मोजकेच सिनेमे केले आहेत. पण, त्यातही रिंकूने आपल्या उत्तम अभिनयाची छाप सोडली. मराठी चित्रपट इन्डस्ट्रीमधली ती आताची प्रसिद्ध, तरुण आणि आघाडीची अभिनेत्री आहे. लहान वयातच 'सैराट' सिनेमा करुन ती घराघरात पोहोचली. मध्यंतरी तिने 'धडक' गर्ल जान्हवीची भेट घेतली आणि फोटोही शेअर केला. 'मेकअप' या तिच्या आगामी चित्रपटामधून रिंकू एका इंटरेस्टिंग रोलमधून समोर येणार आहे. ट्रेलर आणि चित्रपटाची गाणी पाहून रिंकूला एका नव्या रुपात पाहायला चाहतेही उत्सुक आहेत.
बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या मानधनाची चर्चा तर नेहमीच होते. कोणती सेलिब्रिटी किती पैसे घेते हे अनेकदा समोर आले आहे. पण, मराठी कलाकारांची चर्चाही आता होत आहे आणि यामध्ये आणखी एका नावाची चर्चा आहे ती म्हणजे रिंकूची. रिंकूने तिचा आगामी सिनेमा 'मेकअप'साठी चक्क 27 लाख रुपये मानधन घेतले असलल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा : आमिरच्या 'त्या' रिकवेस्टमुळे खिलाडी कुमारने बदलली रिलिज डेट
रिंकूची प्रसिद्धी खूप जास्त आहे. शिवाय तिच्या उत्तम अभिनयाची जाण तर सर्वांनाच आहे. अशामध्ये रिंकू मराठीतील जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.चित्रप़टाचं दिग्दर्शन आणि लेखन गणेश पंडीत यांनी केलं आहे. तर, दिपक मुकुट, हिरेन गडा, निरज बर्मन, अमित सिंग आणि बी. राव यांनी केलं आहे. चिन्मय आणि रिंकू ही जोडी मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार आहे. सैराटशिवाय रिंकू मानसू मल्लिगे, नूर जहान, कागर या चित्रपटातून झळकली आहे. शिवाय ती ताहिर शब्बीरच्या वेब सिरिजमध्येही दिसणार आहे. '100' असं या सिरिजचं नाव असून ती हॉटस्टारवर रिलिज होणार आहे.