'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला कोरोना; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

daljit kaur
daljit kaur

राज्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. नुकतंच अभिनेता विक्रांत मेस्सीला कोरोना झाल्याचं वृत्त समोर आलं. त्यानंतर आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि  'बिग बॉस १३' फेम दलजित कौरलाही कोरोना झाल्याचं समजतंय. अनेक हिंदी मालिका, डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या दलजितने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. दलजितला उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये दलजित रुग्णालयात असल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्यासोबत पीपीई किटमधील रुग्णालयातील कर्मचारीसुद्धा आहेत. 'कोरोनाच्या विळख्यापासून मीसुद्धा वाचू शकले नाही. माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच मी लिलावती रुग्णालयात दाखल झाले', असं तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. कोविड योद्धांचं कौतुक करत तिने पुढे लिहिलं, 'मी सतत त्यांना विचारत असते की पीपीई किटमध्ये दिवसभर ही लोकं कसे काम करतात आणि याच परिस्थितीत त्यांच्या चेहऱ्यावर दिवसभर हास्य पाहायला मिळतं. हे आमचं काम असून रुग्णांना मदत करण्यात आम्हाला आनंद होतो, असं प्रामाणिक उत्तर त्यांनी मला दिलं.' दलजितला एक मुलगा असून सुदैवाने त्या कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 

अनेक बॉलिवूड कलाकारांना कोरोना
दलजितच्या आधी विक्रांत मेस्सी, आमिर खान, आर. माधवन, कार्तिक आर्यन, रणबीर कपूर, मनोज वाजपेयी, सिद्धार्थ चतुर्वेदी, तारा सुतारिया, आशिष विद्यार्थी, संजय लीला भन्साळी यांनाही कोरोनाचा सामना करावा लागला. 

दलजितने २००९ मध्ये टीव्ही अभिनेता शालीनसोबत लग्न केलं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. दलजितने शालीनवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. दलजित 'बिग बॉस'च्या तेराव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मात्र पुरेशी मतं न मिळाल्याने तिला लवकरच बिग बॉसचं घर सोडावं लागलं होतं. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com