आरती आणि सिद्धार्थमध्ये वाद शिगेला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

सिद्धार्थ डे ने आरतीबाबात अपमानजनक कमेंट केली. जी सार्वजनिक रित्या बोलने गैर आहे

मुंबई : बिग बॉस हिंदी 13 शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस टास्क कठिण होत चालले आहेत. टास्कच्या दरम्यान आपली बेस्ट कामगिरी करण्याच्या प्रयत्नात अनेकवेळा स्पर्धाकांमध्ये भांडणे होत असतात. काही वेळा तर ही भांडणे मारामारी पर्यंत पोहचतातय तर काही वेळा एकमेकांवर वयक्तीक कमेंट्स करतात.

टास्कच्या दरम्यान, आरती सिंह सिद्धार्थ डे चा हात सोडवण्यासाठी त्याच्यावर तिखट टाकले. यामुळे संतापलेल्या सिद्धार्थ डे ने आरतीबाबात अपमानजनक कमेंट केली. जी सार्वजनिक रित्या बोलने गैर आहे. यावर आरतीदेखिल संतापली. आरतीने सिद्धार्थवर हात उचलत धमकी दिली की, तिच्या भावाने सांगितलय जो आपल्याशी चुकीचं वागेल त्याचं तोंड फोड, हवं तर आपण 2 कोटीचा दंड भरू.

आरती ही अभिनेता गोविंदा याची भाची आहे. नेटीझन्सने यावर आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. सिद्धार्थने आरतीवर केलेली वयक्तीक कमेंट नेटीझन्सला देखिल पचनी पडलेली नाही. त्यांनी देखिल सिद्धार्थवर जोरदार टीका केली आहे. लोकं म्हणत आहे की, नॅशनल टेलिव्हिजनवर एका मुलीशी अशा प्रकारचा व्यवहार करणाऱ्यांना शोमधून बाहेर काढायला हवे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss 13 social media users slams sidharth dey for commenting on aarti singh