
13 जानेवारीचा शो हा खास ठरला होता. त्यात राखी सावंत हिनं सर्वांचे मनोरंजन केले होते. त्यात विकास गुप्ता हा प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर पडला आहे.
मुंबई - बिग बॉस मध्ये कधी काय होईल सांगता येणार नाही. वाद, भांडणे, शिवीगाळ, आरोप - प्रत्यारोप यामुळे हा शो कायम वादाच्या भोव-यात सापडल्याचे दिसून आले आहे. बिग बॉसचा 14 वा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातील एक स्पर्धक राखी सावंत भलतीच चर्चेत आली आहे. त्याचे कारणही तसेच धक्कादायक आहे.
बिग बॉस च्या 14 व्या सीझनमध्ये जॅस्मिन भसीन आणि अभिनव शुक्ला. रुबीना दिलेक आणि एजाज खान यांची अंतिम स्पर्धकाच्या यादीत निवड झाली आहे. त्यानंतर निक्की तांबोळी, राहूल वैद्य आणि अली गोनी यांची बिग बॉ़सच्या घरात इंट्री झाली आहे. 13 जानेवारीचा शो हा खास ठरला होता. त्यात राखी सावंत हिनं सर्वांचे मनोरंजन केले होते. त्यात विकास गुप्ता हा प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर पडला आहे. त्यामुळे घरातील इतर सर्व सदस्य हे चिंतेत होते. त्यांच्यात थोडे भीतीचे वातावरण होते. यासगळ्यात चर्चा झाली ती राखी सावंतची तिनं चक्क अभिनव शुक्लाच्या नावानं 'एक चुटकी सिंदूर की किमत' चा सीन करुन सर्वांना धक्का दिला.
राखी सावंतचा तो सीन आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. बुधवारचा बिग बॉसचा एपिसोड हा विशेष लोकप्रिय झाला आहे. राखीनं हातात दुर्बिण घेऊन प्रेमाचा शोध घेताना दिसून आली आहे. त्यावेळी तिची आणि अभिनव शुक्ला यांच्यातील मस्तीही चाहत्यांना आवडली असल्यानं त्या दोघांच्याही सोशल अकाऊंटवर लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडला आहे. राखी ही अभिनवच्या नावानं भांगेत कुंकू लावत असून त्यावेळी विकास गुप्तानं एका ठिकाणी कॅमेरा लपवून ठेवला होता. अली गोनी अर्शी खानला म्हणतो की, मला सोनालीच्या भावनांविषयी आदर आहे. आता त्यावर अधिक चर्चा नको. अर्शी ही सोनाली आणि अलीमध्ये मैत्रीचे नाते तयार व्हावे यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
परिणीती चोप्राच्या ‘द गर्ल ऑन ट्रेन’ च्या टीझरचा धुमाकुळ
या अगोदर अर्शी खान आणि राखी सावंत यांच्यात 'लाश का कफन' वरुन बोलणं झालं होतं. त्यानंतर राखी सावंतची एजाज खान बरोबर वादावादी झाल्यानं ती रडायला लागते. एवढेच नव्हे तर एजाज खान, राहूल वैद्य यांची रुबीनाशी भांडणे होतात. असे त्या एपिसोडमध्ये दाखविण्यात आले आहे.