सलमान खानसोबत सिद्धार्थ शुक्ला करणार 'बिग बॉस १४' होस्ट?

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 16 September 2020

या शो विषयी दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता तर अशी चर्चा आहे की या शोमध्ये 'बिग बॉस १३'चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला देखील दिसणार आहे.

मुंबई- 'बिग बॉस १४' ची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकत्याच सलमान खानच्या नवीन प्रोमोनुसार हा शो शनिवार ३ ऑक्टोबर रोजी टेलिकास्ट केला जाणार आहे. या शो विषयी दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता तर अशी चर्चा आहे की या शोमध्ये 'बिग बॉस १३'चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला देखील दिसणार आहे.

हे ही वाचा: खासदार जया बच्चन यांना ड्रीम गर्ल हेमा मालिनीचं समर्थन  

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ शुक्ला स्पर्धकांचं निरिक्षण करणार आहे. त्यांच्या परफॉर्मन्सवर स्वतःची प्रतिक्रिया देणार आहे. हे जवळपास सलमान खानसोबत होस्ट करण्यासारखंच आहे. 'बिग बॉस १३' नंतर सिद्धार्थ शुक्लाच्या प्रसिद्धीमुळे १० पटीने वाढ झाली आहे. शो संपल्यानंतरही चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षावर करत आहेत. त्याची ही लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी त्याला 'बिग बॉस १४' सोबत जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र यावेळी तो स्पर्धक म्हणून नाही तर एका खास सेगमेंटसाठी येणार असल्याची चर्चा आहे. सिद्धार्थची भूमिका ही या सिझनच्या करारा जबाब या थीमशी संबंधित असल्याचं म्हटलं जातंय. तो घराच्या बाहेरुन स्पर्धकांवर नजर ठेवणार आहे. निर्माते अजुन या फॉरमॅटविषयी सिद्धार्थसोबत चर्चा करत आहेत. सगळं फायनल झाल्यावरंच याची अनाऊन्समेंट करण्यात येईल. 

सिद्धार्थ शुक्ला 'बिग बॉस १३' चा विजेता होता. त्याचा प्रवास खूपंच इंटरेस्टिंग होता. आसिम रियाज, रश्मी देसाई यांच्यासोबत्या वादामुळे सिद्धार्थ नेहमी चर्चेत होता. तसंच शेहनाज गिल आणि त्याची जोडी प्रेक्षकांना इतकी पसंत पडली की त्यांनी 'सिडनाझ'चा एक हॅशटॅग तयार केला होता.  

bigg boss 14 sidharth shukla to co host with salman khan  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss 14 sidharth shukla to co host with salman khan