खासदार जया बच्चन यांना ड्रीम गर्ल हेमा मालिनीचं समर्थन

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 16 September 2020

बॉलीवूड आणि ड्रग कनेक्शन एक असा मुद्दा बनला आहे ज्याचे पडसाद आता संससेद देखील उमटायला सुरुवात झाली आहे.

मुंबई- सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीनेमध्ये खळबळ उडाली. जो वाद पहिले केवळ एका प्रकणापर्यंत सिमित होता आता तो संपूर्ण बॉलीवूडचा मुद्दा बनला आहे. बॉलीवूड आणि ड्रग कनेक्शन एक असा मुद्दा बनला आहे ज्याचे पडसाद आता संससेद देखील उमटायला सुरुवात झाली आहे. राज्यसभेमध्ये जया बच्चनने रवि किशन यांच्यावर निशाणा साधत 'जिस थाली मे खाया उसी मे छेद  किया' या विधानानंतर खूप मोठा वाद निर्माण झाला. अनेक सेलिब्रिटी जया बच्चन यांना पाठिंबा देत आहेत तर कंगनासारखे काही सेलिब्रिटी त्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

हे ही वाचा: सलमान-संजय दत्तवेळी दयाळु होता मिडिया, रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ बॉलीवूडचं खुलं पत्र  

जया बच्चन यांच्या या विधानानंतर आता बॉलीवूडची ड्रीम गर्ल त्यांच्या पाठिशी उभी राहिली आहे. त्यांच्या नजरेत काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणं किंवा सगळ्यांना ड्रग्सशी जोडणं चूकीचं आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनीने म्हटलंय, 'केवळ बॉलीवूड बद्दलंच का बोललं जातंय? कित्येक इंडस्ट्रीमध्ये असं होतं. आपल्या इंडस्ट्रीत देखील होत असेल. मात्र याचा अर्थ असा नाही की संपूर्ण इंडस्ट्रीचं खराब आहे. ज्याप्रकारे बॉलीवूडवर निशाणा साधला जात आहे ते पूर्णपणे चूकीचं आहे. असं अजिबात नाहीये.'

अभिनेत्री हेमा मालिनीने याआधी सोनम कपूर, अनुभव सिन्हा, फरहान अख्तर, तापसी पन्नू सारख्या सेलिब्रिटींना देखील पाठिंबा दिला आहे. बॉलीवूडचा एक ग्रुप त्यांच्या विधानांचं स्वागत करत आहेत. अशातंच आता हा मुद्दा राजकिय मुद्दा देखील बनला आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांचं हा खेळ लवकर संपणारा नाहीये. तेव्हा हा मुद्दा कोणत्या मर्यादेपर्यंत खेचला जात आहे हे येत्या काळात कळेल.    

jaya bachchan drug comment hema malini support actress  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jaya bachchan drug comment hema malini support actress