सलमानच्या धमकीनं सणकी बिचुकले बिथरला..Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abhijit Bichukale,Salman Khan

सलमानच्या धमकीनं सणकी बिचुकले बिथरला

'बिग बॉस 15' चा सिझन आता अंतिम टप्प्याच्या दिशेनं सुरू झालाय. वादांना तर हिंदी बिग बॉसच्या घरात निमित्तच हवं असतं. यंदाच्या सिझनला सुरुवातीला हिंदी 'बिग बॉस' ला हवा तसा टीआरपी मिळाला नाही. त्यामुळे वाहिनीने अभिजित बिचुकले(Abhijit Bichukale),देवोलिना भट्टाचारी,राखी सावंत,तिचा नकली नवरा असे अतरंगी कॅरेक्टर शो मध्ये आणले. वाहिनीला वाटलं रंगत येईल पण होतय उलटच. अभिजित बिचुकलेनं तर नुसता हैदोस मांडलाय घरात. तो रोज नवनवीन काहीतरी नसत्या उचापत्या करतोय ज्यानं कॉन्ट्रोवर्सीच निर्माण होतेय अन् शो ला सर्वच स्तरातून नावं ठेवली जात आहेत. यंदा राखी सावंतचाही आवाज हवा तसा ऐकायला मिळत नाहीय बिचुकले पुढे.

हेही वाचा: सिद्धार्थ चांदेकरला का काढाव्या लागल्यात 'उठा-बश्या'?

आता तर बिचुकलेनं थेट सलमान खानच्या(Salman Khan) विरोधात आवाज उठवलाय. खरंतर तो इतकं नकारात्मक काहीतरी करतोय तरी सलमाननं काही गोष्टीत त्याला सपोर्ट केला होता. पण त्यानं त्याचही भान न ठेवता थेट सलामनविरोधात आवाज उठवलाय. 'विकेंड का वार' चा कलर्स वाहिनीनं जो प्रोमो शेअर केलाय त्यात सलमानची धमकी,बिचुकलेचं बिथरणं सारंच अंगावर काटा आणणारं आहे. काय घडलं नेमकं की सलमाननं सीमा ओलांडत पहिल्यांदा कोणत्या तरी स्पर्धकाला अशी धमकी दिली असेल किंवा मग अशा भाषेत दरडावलं असेल.

'विकेंड का वार' मध्ये सलमान खान प्रत्येक स्पर्धकाला धारेवर धरतो हे तर आपल्याला माहितीच आहे. यावेळीही त्यानं करण कुंद्राला डाफरलं,पण जेव्हा अभिजित बिचुकलेला तो त्याच्या अर्वाच्य भाषा वापरण्यावरून बोलायला गेला तेव्हा अभिजितचं पाय वर करून बसणं सलमानला खटकलं. सलमान त्याला म्हणाला,''तू घाणेरड्या भाषेत तुझ्या कुटुंबाशी बोलशील का? पुन्हा जर अशी भाषा मी ऐकली तर तुझे केस ओढून मी घराबाहेर खेचत आणून मारेन तुला''. त्यावर अभिजित म्हणाला,''मी बोलू का?'' ते ही एकदम रागात. तेव्हा सलमान त्याच्यावर आणखी कडक भाषेत डाफरला. पण यावर बिचुकले बिथरला अनं तडक उठून घराच्या दरवाजाजवळ जाऊन तो तावातावानं उघडायला सांगू लागला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top