'सुकलेला नाना पाटेकर'; सलमानने बिचुकलेची उडवली खिल्ली | Bigg Boss 15 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abhijit Bichukale, Salman Khan

'सुकलेला नाना पाटेकर'; सलमानने बिचुकलेची उडवली खिल्ली

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस (Bigg Boss 15). सध्या हिंदी बिग बॉसचा पंधरावा सिझन सुरू आहे. या सिझनच्या शुक्रवारच्या स्पेशल एपिसोडमध्ये सूत्रसंचालक सलमान खानने (Salman Khan)स्पर्धक अभिजीत बिचुकलेची (Abhijit Bichukale) जोरदार खिल्ली उडवली. सलमानने चक्क त्याला 'सुखा हुआ नाना पाटेकर' असं म्हटलं. सुरुवातीला सलमानने सिद्धार्थ निगम आणि जन्नत जुबेर यांचं स्वागत केलं. त्यानंतर त्याने अभिजीतकडे खुणावर त्यावरून मस्करी करण्यास सुरुवात केली. "डान्स का डी, म्युझिक का एम और संगीत का एस भी नही जानते. वो जो सुखा हुआ नाना पाटेकर है, उसको नहीं आता," असं तो म्हणतो.

यावेळी सलमानने अभिजीतच्या गायन कौशल्याचीही टेर खेचली. "या घरात एक भावी पीएमएस आहे. पीएमएस म्हणजे पंतप्रधान गायक," अशा शब्दांत सलमानने बिचुकलेला चिडवलं. यापूर्वी सलमानने एक टास्क आयोजित केला आणि स्पर्धकांना त्यांच्या सह-स्पर्धकांपैकी एकासाठी नवीन वर्षाचं संकल्प सुचवण्यास सांगितलं. या टास्कदरम्यान रश्मी देसाईने बिचुकलेनं ‘आत्मनिर्भर’ व्हावं असं सुचवलं. रश्मीचा हा संकल्प ऐकून सलमान म्हणाला, "मै चाहता हूँ ये आत्मा ही बन जाए जल्दी से."

हेही वाचा: ..तेव्हा मला अनेकांनी वेड्यात काढलं होतं- विद्या बालन

अनु मलिक, पलक तिवारी आणि शेखर रविजियानी हेदेखील शोमध्ये सहभागी झाले होते. शेखरचं नवीन गाणं गाण्यास सांगितल्यानंतर सलमानने अभिजितला सांगितलं, "टीव्हीवर गात आहेस, म्हणून ठीक आहे. एकवेळ टीव्ही आपण बंद करू शकतो. पण तू चुकीच्या चॅनेवर गात आहेत. या चॅनलची टीआरपी कमी होऊ शकते. आम्ही हा शो संपल्यानंतर सर्वांना एक टी शर्टसुद्धा देणार आहोत. त्यावर लिहिलेलं असेल, 'आम्ही बिचुकलेपासून वाचलो.'"

आपल्या विधानांमुळे प्रसिद्ध असणारा अभिजीत बिचकुले हा बिग बॉस मराठी २ चा स्पर्धक होता. २०१५ मध्ये बिग बॉस मराठीच्या सेटवरून अभिजीतला चेक बाउंस झाल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्या विरोधात सातारा कोर्टने अरेस्ट वॉरंड जारी केलं होत. अटक करण्यापूर्वी अभिजीतला अनेकदा समन्स देण्यात आला होता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top