..तेव्हा मला अनेकांनी वेड्यात काढलं होतं- विद्या बालन | Vidya Balan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vidya Balan

..तेव्हा मला अनेकांनी वेड्यात काढलं होतं- विद्या बालन

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचणारी अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिने स्वत:च्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर स्वत:ची बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. 'इश्किया', 'द डर्टी पिक्चर', 'कहानी' अशा चित्रपटांमध्ये तिने चौकटीबाहेरच्या भूमिका साकारल्या. त्यातही २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द डर्टी पिक्चर' (The Dirty Picture) या चित्रपटातून तिने तिच्या अभिनयकौशल्याची नवीन बाजू प्रेक्षकांसमोर सादर केली. या चित्रपटातील तिचं अभिनय पाहून सर्वजण थक्क झाले होते. मात्र हा चित्रपट साईन करताना अनेकांनी मला वेड्यात काढलं होतं, असा खुलासा विद्याने एका मुलाखतीत केला. त्यावेळी आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दलही तिने सांगितलं. 'द डर्टी पिक्चर'मध्ये विद्याने अभिनेत्री सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती.

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत विद्याने सांगितलं, "ज्या क्षणी मी चित्रपटाचे दिग्दर्शक मिलन लुथरिया यांना भेटले, त्याच क्षणी मला त्यांच्यावर आणि त्यांच्या कथेवर विश्वास बसला होता. चित्रपटातील त्या भूमिकेचं एक विशिष्ट सौंदर्य आहे आणि ते अजिबात कमी दर्जाचं नाही हे मला ठाऊक होतं. या प्रोजेक्टमध्ये एकता कपूरसुद्धा सहभागी होती. माझ्या करिअरची सुरुवात तिच्यामुळे झाली आणि मी तिला नीट ओळखते. त्यामुळे मला चित्रपट किंवा माझ्या व्यक्तीरेखेबद्दल जराही शंका नव्हती. पण अनेकांनी मला त्यावेळी अक्षरश: वेड्यात काढलं होतं. अशा भूमिकेमुळे तुझ्या प्रतिमेला धक्का पोहोचेल, असं अनेकजण म्हणत होते."

हेही वाचा: 'RRR'चं प्रदर्शन पुन्हा पुढे ढकललं; प्रेक्षकांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा

'द डर्टी पिक्चर' साईन करण्यापूर्वी आईवडिलांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल तिने पुढे सांगितलं, "तुला जे योग्य ते कर, असं ते म्हणाले. त्यांनी मला पाठिंबा दिला होता. कारण सिल्क स्मिताची भूमिका साकारण्याबाबत मी ठाम होते." या चित्रपटामुळे विद्या बालनच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळाली. चित्रपटातील अभिनयासाठी विद्याला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top