'सगळी तुझ्या कर्माची फळं': रियाजवर सिद्धार्थ शुक्लाचे फॅन्स भडकले | riaz trolled by sidhartha shukla fans social media | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Umar Riaz Evicted
'सगळी तुझ्या कर्माची फळं': रियाजवर सिद्धार्थ शुक्लाचे फॅन्स भडकले

'सगळी तुझ्या कर्माची फळं': रियाजवर सिद्धार्थ शुक्लाचे फॅन्स भडकले

बिग बॉस (bigg boss 15) हा नेहमीच चर्चेत असणारा रियॅलिटी (reality show) शो आहे. त्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरु असते. सोशल मीडियावर (social media) देखील त्या मालिकेतील (trolled) सहभागी झालेल्या स्पर्धकांविषयी प्रेक्षक वेगवेगळ्या प्रकारे चर्चा करत असतात. आता या सीझनमधील लोकप्रिय स्पर्धक उमर रियाज (Umar Riaz Evicted) हा त्याच्या वर्तनामुळे चर्चेत आला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्याच्यावर टीका करताना नेटकऱ्यांनी त्याला सिद्धार्श शुक्लाबरोबर (sidhartha shukla) केलेल्या कृतीची आठवण करुन दिली आहे. त्यामुळे उमरवर कडाडून टीका होताना दिसतेय.

उमर रियाज (Umar Riaz) हा आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. दुसरीकडे नेटकऱ्यांनी त्याच्या गतकाळातील काही कृत्यांमुळे लक्षात ठेवले आहे. आणि त्याच्यावर टीका केली आहे. तु सिद्धार्थ सोबत कसा वागला होतास हे लक्षात आहे का, त्यामुळे तुझ्यासोबत तसेच होते आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमरला नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर केलेल्या पोस्टची चर्चा होत आहे. याला म्हणतात कर्म. असा टोमणाही नेटकऱ्यांनी रियाजला लगावला आहे. तो बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याची बातमी समोर आली आहे. ट्विटरवर उमरच्या नावानं हॅशटॅगही सुरु करण्यात आला आहे. त्यातून त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक तो खरचं घराच्या बाहेर पडला आहे किंवा नाही हे आजच्या एपिसोडमधून समजणार आहे.

हेही वाचा: Corona blast in CBI : मुंबई कार्यालयातील २३५ पैकी ६८ जणांना लागण

तो घराबाहेर पडल्याचे अजून ऑफिशयली डिक्लेअर करण्यात आलं नसलं तरी काही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओजमधून नेटकऱ्यांनी तसा अंदाज बांधला आहे. त्यावरुन त्याला ट्रोल करण्यात आले आहे. नेटकऱ्यांनी उमरचं एक जुनं ट्विट शोधून काढले आहे. त्यामध्ये उमर हा बिग बॉसला सिद्धार्थला शोमधून काढण्याची विनंती करताना दिसत आहे. आणि आता उमरच्याबाबत तो प्रकार घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यावरुन त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्यांनं लिहिलं आहे की, तू जसा दुसऱ्यांशी वागला तशाच प्रकारे आता तुझ्यासोबत काही घडत आहे. हे लक्षात घे.

हेही वाचा: Movie Review; प्रेक्षकांच्या भावनेचा बाजार मांडणाऱ्या चॅनेलचा 'धमाका'

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top