esakal | सिद्धार्थ गेला, शहनाजनं सोडलं जेवण...
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धार्थ गेला, शहनाजनं सोडलं जेवण...

सिद्धार्थ गेला, शहनाजनं सोडलं जेवण...

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मनोरंजन क्षेत्रात आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या सिद्धार्थ शुक्लाचं नुकतचं निधन झालं. त्याच्या जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अद्यापही काही चाहते त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिलचाही समावेश आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिनं सिद्धार्श गेल्यापासून अन्न पाणी वर्ज्य केलं आहे. सोशल मीडियावर शहनाजची तिच्या चाहत्यांनी समजूत काढली आहे. तिला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सिद्धार्थशी संबंधित वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या अंत्यविधीला एका चाहत्याला चक्कर आली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सिद्धार्थ आणि शहनाज यांना सिडनाज या नावानं ओळखलं जात होतं.

जेव्हा चाहत्यांचं लक्ष शहनाजकडे जातं तेव्हा त्यांना वाईट वाटते. त्याचं जाण तिला किती धक्कादायक आहे हे त्या एका व्हिडिओतूनही दिसून आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या शहनाजची प्रकृती ठीक नसल्याचे दिसुन आले आहे. आपल्यातून सिद्धार्थ गेला आहे यावर ती विश्वास ठेवायला तयार नाही. तिनं काही दिवसांपासून जेवण सोडलं आहे. ती कुणाशीही बोलत नसल्याचेही सांगण्यात आलं आहे. नेहमी हसणारी आणि सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधणारी शहनाज गिल सध्या वेगळ्या परिस्थितीतून जात असल्याचे दिसून आलं आहे. यासगळ्या बाबत सिद्धार्थच्या आईनं देखील तिची समजूत काढली आहे. त्यांनी तिला आधार दिला आहे. मात्र अजूनही शहनाज त्या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेली नाही.

हेही वाचा: आमीरनं भावाच्या तोंडावर सांगितलं की...

हेही वाचा: क्रिशचा पॅराऑलिंपियन्सला सॅल्युट, पोस्ट व्हायरल

loading image
go to top