तुम्हीही होऊ शकता बिग बॉसमध्ये सहभागी; भरावा लागेल एक फॉर्म

bigg boss
bigg boss

मुंबई - प्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉस शोमधील सदस्यांची भांडण, त्यांचे टास्क पाहायला प्रेक्षकांना आवडतात. बिग बॉस शो पाहताना अनेकांना वाटतं की 'मी तिथे असले असतो तर असं केलं असतं वैगेरे' आता प्रेक्षकांनासुद्धा बिग बॉस शोमध्ये सहभागी होता येणार आहे. बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये सेलिब्रिटींबरोबरच सामान्य जनतादेखील या कार्यक्रमाचा भाग बनू शकते. याबाबतचा निर्णय बिग बॉस शोच्या निर्मात्यांनी घेतला आहे.

तुम्ही देखील 'बिग बॉस 15'च्या घरात जाऊ शकता, परंतु त्यासाठी ऑडिशन देणे गरजेचे आहे. बिग बॉससाठी नोंदणी आणि ऑडिशनची ही प्रक्रिया विनामूल्य आहे. जर तुम्हाला बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम व्हूट अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर साईन- अप करून ऑडिशन द्यायला लागणार आहे. ऑडिशन देण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. व्हूट अॅपवर एक ऑनलाइन फॉर्म मिळेल. जिथे तुमचे नाव, संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी द्यावा लागेल. 

फॉर्मसह एक ऑडिशन व्हिडीओ देणे देखील आवश्यक आहे. ऑडिशनसाठी व्हिडीओ तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. ती म्हणजे हा व्हिडिओ मनोरंजन करणारा असायला हवा. तसंच व्हिडीओ किमान 5 मिनिटांचा आणि 50MB पेक्षा कमी असावा. Avi, Mov, Mp4 अशा कोणत्याही फॉरमॅटमध्ये तुम्ही व्हिडीओ अपलोड करू शकता.

व्हिडीओ अपलोड करण्याची अट अशी आहे की, आपला चेहरा या व्हिडीओमध्ये स्वच्छ आणि पूर्ण दिसावा. तसेच, त्यामध्ये कोणतेही पार्श्वसंगीत असू नये. ऑडिशन व्हिडीओ आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख  30 मार्चपर्यंतच आहे. नंतर ही प्रक्रिया पुढे पूर्ण केली जाईल. आतापर्यंत हजारो लोकांनी या अ‍ॅपवर ऑडिशनसाठी नोंदणी केली आहे.

बिग बॉसच्या सिझन 15मध्ये सामान्य जनते सोबतच इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना सहभागी होणार आहेत. यामध्ये शशांक व्यास, आकांक्षा पुरी, निया शर्मा आणि जेनिफर विगेट अशी अनेक नावे समोर आहेत. बिग बॉसच्या या नव्या सिझनसाठी निकितन धीर, अदा खान, अभिजीत सावंत, निखिल चिंपा, अंकिता लोखंडे, तेजस्वी प्रकाश, मोहित मलिक, शरद मल्होत्रा, एरिका फर्नांडिस आणि रक्षादास खान हे सेलिब्रेटींची नवे चर्चेत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com