
Abdu Rozik : अब्दु रोजिकचं नशीब चमकलं ! भेटली आणखी एक रिअॅलिटी शोची ऑफर
ताजिकिस्तानवरून आलेला अब्दु रोजिक आता आंतरराष्ट्रीय स्टार बनला आहे. एक काळ असा होता की तो पोटापाण्यासाठी रस्त्यावर गाणी गाऊन पैसे कमवत असे. आज जगभरातील लोक त्याला ओळखतात. अब्दु रोजिक याला भारतातही खूप प्रेम मिळाले आहे.
अब्दू रोजिकने 'बिग बॉस 16' मधून वॉलेंट्री एग्जिट घेतली नसती तर कदाचित तो शोच्या अंतिम स्पर्धकांपैकी एक असता. त्याला जनतेचे भरभरून प्रेम आणि मते मिळत होती.
लेटेस्ट वृत्तानुसार, अब्दू रोजिकला एका आंतरराष्ट्रीय रिअॅलिटी शोची ऑफर मिळाली आहे. हा रिअॅलिटी शो यूके स्थित 'बिग ब्रदर' आहे. ETimes च्या मते, 'बिग बॉस 16' नंतर, अब्दूला 'बिग ब्रदर यूके आगामी सीझनसाठी ऑफर मिळाली आणि सोशल मीडिया सेन्सेशनने विलंब न करता ही ऑफर स्वीकारली. तो यावर्षी जून किंवा जुलैमध्ये या शोचा भाग बनू शकतो. 5 वर्षांनंतर 'बिग ब्रदर' पुन्हा कमबॅक करत आहे.
हेही वाचा: Pathaan Movie Release: भोपाळमध्ये 'पठाण'वरून राडा! सिनेमागृहाबाहेर हनुमान चालिसा वाचून कार्यकर्त्यांचा निषेध
अब्दु रोजिक 'बिग बॉस 16' मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक होता. त्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत चाहत्यांचे मनोरंजन केले. 14 जानेवारी 2023 रोजी त्याने कामाच्या वचनबद्धतेमुळे वॉलेंट्री एग्जिट घेतली.
शोमधून बाहेर पडताच अब्दूने त्याचे हिंदी गाणे 'प्यार' लाँच केले. हे गाणे त्याच्या चाहत्यांना खूप आवडले. सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात अब्दुल दिसणार असल्याचेही बोलले जात आहे.