Bigg Boss 16: 'चुगलीखोर आंटी...' अब्दु रोझिक नॉमिनेट होताच, नेटकऱ्यांनी प्रियंकाला झाडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16

Bigg Boss 16: 'चुगलीखोर आंटी...' अब्दु रोझिक नॉमिनेट होताच, नेटकऱ्यांनी प्रियंकाला झाडले

Bigg Boss 16 Abdu Rozik nominated: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध बिग बॉस शो हा आता चांगलाच रंगताना दिसतो आहे. यंदाचा 16 वा सीझन भलताच वादातही सापडला आहे. बिग बॉसच्या घरात सध्या हाय व्होल्टेड ड्रामा सुरु आहे. एकेका स्पर्धकाचे नॉमिनेट होत आहे. अशातच प्रेक्षकांचा आवडता अब्दु रोझिकवर नॉमिनेट होण्याची वेळ येताच नेटकऱ्यांनी बिग बॉसमधील प्रियंकाला धारेवर धरले आहे.

तिसऱ्या आठवड्यानंतर मान्या सिंग बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. त्यानंतर या आठवड्याविषयी बोलायचे झाल्यास, गौतम विज, टीना दत्ता, निमृत कौर अहलुवालिया, गोरी नागोरी, अब्दु रोझिक आणि शिव ठाकरे यांच्यावर नॉमिनेट होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येत्या दिवसांतून बिग बॉसच्या घरातून कोण जाणार असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. मात्र यासगळ्यात स्पर्धकांच्या यादीत जेव्हा अब्दुचे नाव आलेले दिसले तेव्हा मात्र नेटकऱ्यांनी प्रियंकावर सडकून टीका केली आहे.

ज्या स्पर्धकाविषयी प्रेक्षकांना कमालीची कुतूहल आणि प्रेम होते. त्या अब्दुवर घरातून बाहेर होण्याची वेळ आली आहे. तो नॉमिनेट झाल्यानं चाहत्यांची निराशा झाली आहे. याचा परिणाम टीव्ही शोच्या रेटिंगवरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसमधील काही स्पर्धकांनी जाणीवपूर्वक अब्दुला लक्ष्य केल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. त्यात सगळ्यात जास्त रोख हा प्रियंकाकडे असल्यानं नेटकऱ्यांनी तिचा शेलकी विशेषणं वापरुन चांगलाच समाचार घेतला आहे.

प्रियंकानं केवळ अब्दुलाच नव्हे तर साजिद खानला देखील आपला शत्रु मानलं आहे. अब्दुचा आतापर्यतचा टास्क पाहिल्यास तो पहिल्यापासून त्याच्या स्वभावामुळे चाहत्यांच्या प्रेमास पात्र ठरला आहे. चाहत्यांकडून अब्दुला खूप लोकप्रियता मिळते आहे. अशातच प्रियंकानं त्याच्याविषयी केलेली चुगली मात्र बिग बॉसनं गांभीर्यानं घेतली आहे. त्यामुळे तो सध्या नॉमिनेट असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Bigg boss 16: या पुढे बिग बॉसच्या घरात फक्त हिंदीच! इंग्लिश बोलल्यास होणार शिक्षा..

अब्दुला सांगितली जाणारी कामं, त्याच्यावर होणारी टीका, दुसरीकडे त्याची वाढणारी लोकप्रियता हे अनेकांच्या इर्ष्यचे कारण असल्याचे दिसून आले आहे. प्रियंकानं त्याच्याविषयी केलेल्या तक्रारी नेटकऱ्यांना आवडल्या नसून त्यांनी तिला चुगलखोर आंटी असे म्हटले आहे.

हेही वाचा: Viral Video : नववधूचा डान्स बघण्यासाठी अख्खं गाव उलटलं, नवरदेवाची करामत पाहून तुम्हालाही धक्का बसेल