Bigg Boss 16 : 'देनेवाला जब भी देता...' बिग बॉसच्या स्पर्धकांचं नशीबच पालटलं! लॉटरी लागली

टीव्ही मनोरंजन विश्वात आपल्या हटकेपणासाठी ओळखला जाणारा रियॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. या रियॅलिटी शो चा आता सोळावा सीझन सुरु आहे.
Bigg Boss 16
Bigg Boss 16 esakal

Bigg Boss 16 Contesnstant Ekta Kapoor Tv entertainment queen : टीव्ही मनोरंजन विश्वात आपल्या हटकेपणासाठी ओळखला जाणारा रियॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. या रियॅलिटी शो चा आता सोळावा सीझन सुरु आहे. भारतीय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या शोमधील यंदाचा सीझन चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्याशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे.

बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या काही स्पर्धकांची चांगलीच लॉटरी लागली आहे. यावेळच्या सीझनमधील स्पर्धकांना वेगवेगळ्या ऑफर्स येताना दिसत आहे. कुणाला मोठे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत तर कुणाला वेबसीरिज किंवा चित्रपटासाठी विचारणा झाली आहे. यंदाचा सीझन संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना दुसरीकडे त्यांना मिळत असलेल्या ऑफर्स लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Also Read - ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

बिग बॉसमधील चार ते पाच स्पर्धकांना बॉलीवूडकडून ऑफर्स आल्या आहेत. सीझनचा समाप्ती होण्या अगोदरच अशा संधी येत असल्यानं त्या स्पर्धकांनी आनंद व्यक्त केला आहे. कुणाला टीव्ही शोमधील प्रसिद्ध मालिकेमध्ये महत्वाची भूमिका मिळाली आहे. तर कुणाला वेबसीरिज आणि जाहिरातीची ऑफर मिळाली आहे. आता फक्त त्या स्पर्धकांचा घरातून बाहेर येण्याचा अवकाश आहे.

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील क्वीन म्हणून जिच्याकडे पाहिले जाते त्या एकता कपूरनं दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांच्याबरोबर लव सेक्स और धोका २ आणि एलएसडी २ ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी त्यांनी निमरत कौर अहलुवालियाची निवड केली आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Bigg Boss 16
Kuttey Review : 'कुत्ते' पाहिल्यावर तोंडातून शिव्याच बाहेर पडणार! नुसताच...

याशिवाय एकता कपूरनं नागिन ७ साठी बिग बॉसमधील चार स्पर्धकांना घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या नागिनचा ६ वा सीझन सुरु आहे. मात्र कुणाला संधी मिळणार याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र टीना दत्ता, प्रियंका चौधरी यांना नागिन ७ मध्ये संधी मिळणार असे बोलले जात आहे.

Bigg Boss 16
Pathan Movie Review : शाहरुख, दीपिका अन् जॉनचा पठाण म्हणजे देशभक्तीचा केविलवाणा प्रयत्न

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com