Abdu Rozik: बाथटबमध्ये कपडे धुताना अब्दूनं केली 'ही' मोठी चूक..लोकांनी पाहताच सुरु केला ट्रोलिंगचा मारा Abdu Rozik Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abdu Rozik

Abdu Rozik: बाथटबमध्ये कपडे धुताना अब्दूनं केली 'ही' मोठी चूक..लोकांनी पाहताच सुरु केला ट्रोलिंगचा मारा

Abdu Rozik: बिग बॉस १६ चा क्यूट स्पर्धक म्हणून संपूर्ण देशवासियांची मनं जिंकणारा अब्दू रोझिक भले आता शो चा हिस्सा नसला तरी सोशल मीडियावर तो भलताच सक्रिय दिसतो. बिग बॉस १६ मधून बाहेर पडल्यावर अब्दू प्रमाणापेक्षा अधिक लाइमलाइटमध्ये आहे.

अब्दूचा जगभरात तगडा चाहता वर्ग आहे. भारतातही त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्यांची संख्या वाढताना दिसतेय. यात काहीच शंका नाही की आता अब्दू रोझिक अनेकांचा लाडका बनलाय पण त्याच्या एका लेटेस्ट व्हिडीओमुळे त्याला खूप वाईट पद्धतीनं ट्रोल केलं जात आहे.(Bigg Boss 16 Ex contestant Abdu Rozik Bathtub video troll)

१९ वर्षाच्या अब्दूनं सोशल मीडियावर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे, व्हिडीओत तो बाथमध्ये बसून आपले कपडे धुताना दिसत आहे. यादरम्यान अब्दू आपलं गाणं 'प्यार' हे गाताना दिसत आहे.

तसं अब्दू रोझिकच्या प्रत्येक व्हिडीओवर नेटकरी खूश झालेले दिसतात पण आताच्या त्याच्या बाथटबवाल्या व्हिडीओवर लोक त्याला खूप ट्रोल करताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की अब्दूनं पाण्याचा नळ सुरु ठेवला आहे,ज्यामुळे स्पष्ट दिसतंय की तो पाणी वाया घालवत आहे. या कारणामुळे अब्दूला लोक खूप सुनावताना दिसत आहे.

हेही वाचा: T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

बिग बॉस १६ चा सर्वात फेव्हरेट स्पर्धक म्हणून ओळखला जाणारा अब्दू रोझिक तझाकिस्तानचा राहणारा आहे. तो तझाकिस्तानचा प्रसिद्ध गायक असण्यासोबतच एक प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार देखील आहे. दुबईतही त्याला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.

अब्दू रोझिकच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचं झालं तर बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा सिनेमा 'किसी का भाई किसी की जान' मध्ये तो लवकरच दिसणार आहे. बातमी आहे की त्याला 'बिग ब्रदर्स यूके' च्या नव्या सिझनसाठी ऑफर मिळाली आहे आणि त्यानं ही ऑफर स्विकारल्याचं देखील कळत आहे.