
Bigg Boss 16 Final: एक नारी थी सबपर भारी! प्रियंका चहर चौधरीचं स्वप्न भंगलं..चाहत्यांची निराशा
टीव्हीचा सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस 16 ने गेल्या 4 महिन्यांपासून सर्वांचे जोरदार मनोरंजन केले.आज या शोचा शेवटचा दिवस मोठ्या उत्साहात पार पडत आहे. बिग बॉस 16 मध्ये मोठा गोंधळ झाला आहे, घरातून बाहेर काढण्यात आलेल्या एमसी स्टॅनला घरामध्ये परत पाठवण्यात आले आहे आणि प्रियंका चहर चौधरीला बाहेर काढण्यात आले आहे.
प्रियंकाने तिच्या प्रेमळ स्वभावाने चाहत्यांची मने जिंकली. त्याच्या मतांमुळेच ती या शोची विनर होणार अशी आशा चाहत्यांना होती मात्र तस झालेलं नाही. आता घरात शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे उरले आहे. प्रियंका घरात ऐकटीच सर्वांना भिडली. तिने एकटीने स्वबळावर हा गेम खेळलाच नाही तर सर्वांची मनेही जिंकली.
प्रियंका बद्दल बोलायचं झालं तर तिला सोशल मीडियावर अनेकांनी संभाव्य विजेता म्हणून घोषित केलेलं होत. यावर्षीच्या सीझनमध्ये सर्वाधिक प्रभावशाली आणि प्रबळ दावेदार म्हणून प्रियंका दिसली. परफॉर्मन्सवर कौतूकाचा वर्षावही केला गेला.
बिग बॉसनेही स्वत: तिला एक धाडसी, स्पष्टवक्ती आणि खूप आत्मविश्वासू स्पर्धक बोललं होत. प्रियंका चहर चौधरीची ही या घरातील सर्वात हुशार मुलगी आहे आणि लीडर होती. ती आता या सिझनची विजेती होता होता राहिली त्यामुळं चाहत्यांची निराशा झाली. प्रियंकाचे चाहते आता बिग बॉसला धारेवर धरत आहे. त्यांना हा निकाल योग्य वाटतं नाही आहे.