Bigg Boss 17 Update: बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी सुरु झाले राडे! विकीला झापलं तर कुणामध्ये झालं कडाक्याच भांडण?

Bigg Boss 17 Update:
Bigg Boss 17 Update: Esakal

Bigg Boss 17 Episode 1: टीव्हीचा सर्वात वादग्रस्त आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' सुरू झाला आहे. एकीकडे प्रेक्षक आता हा नवा सिझन पाहण्यासाठी उत्सुक आहे तर दुसरीकडे पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात राडे सुरु झाले आहेत. तर चाहते या शोचा पुरेपूर आनंद घेत आहेत.

यंदा 17 स्पर्धक घरात लॉक झाले आहेत आणि हे स्पर्धक दिल, दिमाग आणि दम या थीमवर आधारित मोहल्ला 1, मोहल्ला 2 आणि मोहल्ला 3 या भागात राहत आहेत. तर पहिल्याच एपिसोडमध्ये या तिन्ही भागात जाण्याबाबत कुटुंबातील सदस्य खुपच गोंधळलेले दिसले.

Bigg Boss 17 Update:
Smita Patil Death Anniversary : 'ना गोरा गोमटा चेहरा, ना झिरो फिगर..'

तर पहिल्याच दिवशी घरात भांडणाला सुरुवात झाली. अभिषेक आणि ईशा मालवीयाने घरात एंट्री घेतली. तर आता हे दोघे कुठे राहणार यावरुन दोघांमध्ये वादविवाद झाले. दोघे एकमेंकावर ओरडले आणि सर्व स्पर्धक दोघांमधील भांडणाची खिल्ली उडवली. तर दुसरीकडे बिगबॉसने अंकिताला फेव्हर दिला आहे आणि अंकिता त्याची आवडती स्पर्धक असल्याचे सांगितले.

Bigg Boss 17 Update:
Hema Malini's Birthday: बर्थडे 'ड्रीम गर्ल'चा अन् जल्लोष साऱ्या बॉलिवूडचा ! हेमा मालिनींचा 75 वा वाढदिवस जोरात साजरा

तर यावेळी बिग बॉसचे नवे गाणे देखील प्रेक्षक आणि स्पर्धकांच्या भेटीला आले आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे गाणे वाजताच सर्व स्पर्धक नाचताना दिसले, तर बिगबॉसने स्पर्धकांना या गाण्याबाबात आणि घरातील काही नियमांबाबात सांगितले.

यानंतर बिग बॉसच्या घरात किचनच्या ड्युटीबाबतही स्पर्धकांमध्ये वाद झाले. यात सनी आणि अभिषेक यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर जिग्ना, सना, अरुण आणि नावेद यांनी या ड्युटी बाबात चर्चा करुन निर्णय घेतला.

तर पहिल्याच दिवशी अंकिताचा पती विकी जैनला बिग बॉसने फटकारले. त्याचबरोबर या शोला कंटाळवाणा शो होऊ देणार नाही असं बिग बॉसने सर्वांना ठणकावून सांगितले. आता दुसऱ्या दिवशी घरातील स्पर्धक कशाप्रकारे घरात वावरतात आणि एकमेकांसोबत कसे वागतात , किती वाद होतात हे सगळं पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com