esakal | BBM 3: 'बिग बॉस मराठी'च्या घरातून अक्षय वाघमारे बाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

akshay waghmare

बिग बॉस मराठी ३ सिझनमध्ये घरामधून बाहेर पडणारा पहिला सदस्य अक्षय वाघमारे ठरला.

'बिग बॉस मराठी'च्या घरातून अक्षय वाघमारे बाहेर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Bigg Boss Marathi 3: कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी सिझन ३ हे पर्व बरंच चर्चेमध्ये आहे. घरात अवघ्या बारा-तेरा दिवसांमध्ये ग्रुप्सदेखील तयार झाले आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते. (Akshay Waghmare Evicted)

हेही वाचा: BBM 3: 'हाच विजेता ठरणार'; प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा असलेला हा स्पर्धक कोण?

आता या सहा जणांमधून आज कोणाला घरा बाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. शेवटी सुरेखा कुडची आणि अक्षय वाघमारे हे डेंजर झोनमध्ये होते आणि महेश मांजरेकर यांनी घोषित केले की, या आठवड्यामध्ये अक्षय वाघमारेला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. अक्षय बाहेर जाताना घरातील प्रत्येक सदस्याला अश्रू अनावर झाले.

महेश मांजरेकर यांनी अक्षयला घरामधल्या त्याच्या अनुभवाबद्दल विचारलं. तेव्हा तो म्हणाला, “मी सर्वांत जास्त जय, विशाल आणि उत्कर्षला मिस करेन. त्यानंतर विकास आणि तृप्तीताईंची आठवण येईल. त्या घरामध्ये राहणं खूप कठीण आहे. मी टास्क खेळलो तेव्हा पूर्ण जीव ओतून खेळालो.” बिग बॉस मराठी ३ सिझनमध्ये घरामधून बाहेर पडणारा पहिला सदस्य अक्षय वाघमारे ठरला. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल, प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल, आणि कोण घराबाहेर जाईल  हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

loading image
go to top