BBM 3: 'दुसऱ्या लग्नाबद्दल खोटं बोलू नकोस'; स्नेहा वाघवर भडकली काम्या पंजाबी

पहिल्या दोन दिवसांत बिग बॉसच्या घरात आणि सोशल मीडियावर स्नेहाची जोरदार चर्चा होऊ लागली.
kamya punjabi sneha wagh
kamya punjabi sneha wagh

मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री स्नेहा वाघने Sneha Wagh 'बिग बॉस मराठी ३'मध्ये Bigg Boss Marathi 3 स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. शो सुरू होताच पहिल्या दोन दिवसांत बिग बॉसच्या घरात आणि सोशल मीडियावर स्नेहाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. स्नेहाच्या स्वभावाने आणि घरातील इतर सदस्यांसोबतच्या तिच्या वागण्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्नेहाचा पूर्वाश्रमीचा पती आविष्कार दारव्हेकरसुद्धा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. वयाच्या १९व्या वर्षी स्नेहाने आविष्कारशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. आविष्कारवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत स्नेहाने त्याला घटस्फोट दिला. त्यानंतर स्नेहाने इंटेरिअर डिझाइनर अनुराग सोलंकीशी २०१५ मध्ये लग्न केलं. स्नेहाचं दुसरं लग्नसुद्धा फार काळ टिकलं नाही. आता अभिनेत्री काम्या पंजाबी Kamya Punjabi हिने स्नेहावर निशाणा साधला आहे. बिग बॉसच्या घरात व्हिक्टिम कार्ड खेळू नको, अशा शब्दांत काम्याने स्नेहाला सुनावलं आहे. काम्याने बिग बॉस हिंदीच्या सातव्या पर्वात भाग घेतला होता. Bigg Boss Marathi 3 controversy

स्नेहाची जुनी मुलाखत शेअर करत काम्याने ट्विट केलं, 'तुला बिग बॉसच्या घरात यायचं होतं, हे ठीक आहे. पण त्यासाठी व्हिक्टिम कार्ड का वापरायचं? तुझ्या पहिल्या लग्नाविषयी माहित नाही पण फक्त खेळासाठी तुझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल खोट्या गोष्टी पसरवू नकोस. सत्य काय आहे ते मी सर्वांसमोर आणू शकते.' काम्याच्या या ट्विटनंतर स्नेहाच्या चाहत्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

टीकाकारांना उत्तर देत काम्या पुढे म्हणाली, 'या देशात जेव्हा एखादी महिला ही अबला बनून काही सांगत असेल तर तिच्यावर सगळेच विश्वास ठेवतात. सत्य घटना माहित नसताना पुरुषाला चुकीचं समजलं जातं. पण या प्रकरणात मला सत्य माहित आहे. कारण त्या व्यक्तीला मी खूप चांगल्या प्रकारे ओळखते.'

kamya punjabi sneha wagh
'हा सर्वांत मोठा घोटाळा'; विजय आनंद यांचा कोरोनाप्रतिबंधक लस घेण्यास नकार
kamya punjabi sneha wagh
Bigg Boss Marathi 3: घटस्फोटानंतर एकाच घरात स्नेहा-आविष्कार

१९ सप्टेंबरपासून बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी स्नेहाचं सहस्पर्धकांशी भांडण झालं. तेव्हापासून स्नेहा सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com