esakal | विकासच्या कुटुंबावर टीका करणाऱ्या जयवर भडकले नेटकरी
sakal

बोलून बातमी शोधा

vikas patil, jay dudhane

'हे बिग बॉस मराठी आहे WWE नाही', असं म्हणत अनेकांनी जयला रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला.

BBM 3: विकासच्या कुटुंबावर टीका करणाऱ्या जयवर भडकले नेटकरी

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Bigg Boss Marathi 3: 'बिग बॉस मराठी ३'च्या घरात सदस्यांना 'वाचव माझे पाणी' हा टास्क देण्यात आला होता. या टास्कदरम्यान जय दुधाणे Jay Dudhane आणि विकास पाटील Vikas Patil यांच्यात जोरदार भांडण झालं. टास्कचे संचालक संतोष चौधरी (दादुस) यांच्याकडे विकास तक्रार करत होता. विशाल निकमने चुकीची खेळी केली असं तो सांगत असताना जय मधे बोलू लागतो. यावेळी विकास आणि जय यांच्यात बाचाबाची झाली. "अरे हा कचरा आहे जो आपण काही दिवसांपूर्वी फेकला, याचा खानदानच असा आहे", असं जय म्हणतो. जयच्या या वागण्यावर नेटकऱ्यांनी तीव्र नापसंती दर्शविली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी जय दुधाणेवर टीका केली आहे.

हेही वाचा: Drugs Case: अशी होती आर्यन खानची तुरुंगातील पहिली रात्र

'हे बिग बॉस मराठी आहे WWE नाही', असं म्हणत अनेकांनी जयला रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला. 'एखाद्याच्या कुटुंबावर टिप्पणीवर करणं कितपत योग्य आहे', असा सवालही नेटकऱ्यांनी केला आहे. 'जयचं वागणं अत्यंत खालच्या पातळीचं आहे', अशीही टीका प्रेक्षकांनी केली.

"या विकासची लायकी नाही माझ्यासोबत बोलायची", असंही जयने त्याला सुनावलं होतं. यावरूनही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलंय. 'जय आणि मीरा या दोघांनाही बिग बॉसच्या घरातून बाहेर काढा', अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. तर 'कपडे घालत जा म्हणावं त्याला आधी', असा उपरोधिक सल्ला जयला एकाने दिला. जय अनेकदा त्याच्या स्वभावामुळे आणि वागण्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होतो. आपल्या तापट स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात अनेकांशी तो वाद ओढवून घेतो.

loading image
go to top