esakal | 'बिग बॉस मराठी'तून शिवलीलाने घेतली माघार
sakal

बोलून बातमी शोधा

shivleela patil

BBM 3: 'बिग बॉस मराठी'तून शिवलीलाने घेतली माघार

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Bigg Boss Marathi 3 : 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वातून स्पर्धक शिवलीला पाटीलने माघार घेतली आहे. शनिवारच्या चावडीत शिवलीलाचा एक व्हिडीओ इतर स्पर्धकांसमोर दाखवण्यात आला. या व्हिडीओद्वारे तिने बिग बॉस हा शो मध्येच सोडत असल्याचं सांगितलं. प्रकृतीच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं तिने स्पष्ट केलं. किर्तनकार शिवलीलाने शोच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. मात्र अचानक तब्येत बिघडल्याने तिला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं. उपचार घेत असतानाच तिने इतर स्पर्धक आणि सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्यासाठी व्हिडीओ पाठवत शो सोडत असल्याची माहिती दिली.

"बिग बॉसच्या घरात असताना माझी प्रकृती बिघडली. गोळ्या घेऊन, आराम करून पाहिलं. मात्र तरीही फारसा फरक पडला नाही. अखेर उपचारासाठी मला बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं. महेश मांजरेकरांनी सूचना दिल्याप्रमाणे मला शोमध्ये खूप चांगली कामगिरी करायची होती. मात्र तब्येत साथ देत नसल्याने मी घरात पुन्हा येऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांत विशाल, मीनल, सोनाली यांच्यासोबत माझी चांगली गट्टी जमली. घरातील इतर स्पर्धकांना मी त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याची विनंती करते", असं ती या व्हिडीओत म्हणते. शिवलीलाचं हे बोलणं ऐकताना विशाल निकम आणि सोनाली यांना अश्रू अनावर होतात.

हेही वाचा: किर्तनकार शिवलीला पाटील वादग्रस्त का ठरली?

शिवलीलाने स्वत: माघार घेतल्याने बिग बॉस मराठी ३ मधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली. बिग बॉसच्या घरामध्ये पार पाडलेल्या नॉमिनेशन कार्यात घरातील सदस्यांनी एकूण सात सदस्यांना घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केलं होतं. घरातील अपुरे योगदान, घरातील वावर, टास्कमधील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीची अकार्यक्षमता या निकषांवर त्यांना नॉमिनेट केलं होतं. यामध्ये शिवलीलाचाही समावेश होता.

loading image
go to top